अखिल कर्नाटक ज्योतिषींची वक्कूट राज्य अध्यक्षपदी गुरुराज आचार्य हेरकल
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
अखिल कर्नाटक ज्योतिषींच्या वक्कूट संघटनेच्या राज्याध्यक्षपदी विजयपूरचे श्री. साक्षी पंचांग कर्ते गुरुराज आचार्य हेरकल यांची, तर उपाध्यक्षपदी चिदबंर पंचांगाचे सहायक पंचाग कर्ते भुजंगमूर्ती जी. जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
धारवाड येथे झालेल्या संघटनेच्या सभेत ही निवड करण्यात आली. सभेला संस्थापक अध्यक्ष डॉ. ,आनंद हदीगोळ, श्रीकांत मंगसोळी, सुरेश कोप्पर तसेच ज्योतिषी वास्तुशास्त्र, पुरोहित सेवा आणि विविध धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
१३ जून रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदग्रहण समारंभाचे आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
