अक्कलकोट तालुक्यातील तिर्थस्थळावरील सर्व जुगार अड्डा व अवैध दारु विक्री बंद करावे अन्यथा; मोठी आंदोलन करु- शंकर म्हेत्रे
दुधनी/ प्रतिनिधी- लक्ष्मीकांत पोतदार
अक्कलकोट तालुक्यातील तिर्थस्थळावरील अवैध जुगार अड्डा व अवैध दारु विक्री बंद करावे अन्यथा अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार अशी माहिती शंकर म्हेत्रे यांनी मुलाखतीत सांगितले.
पुढे म्हेत्रे यांनी म्हणाले की शहरी भागात चालणार्या जुगार अड्डा आता तालुक्याच्या ग्रामीण भागातही पोहचु लागले आहे. जुगारीत दररोज लाखांची उलाढाल होत असुन अड्डा चालकांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळत आहेत. त्यामुळे जुगार अड्डा तालुक्यात ग्रामीण भागातही पाय पसरु लागले आहे. या जुगार अड्डायात कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील लोक मोठ्या संख्येने जुगार खेळायला येतात आणि हे जुगार अड्डा रात्रंदिवस सुरु असुन जुगार खेळणार्यांना जागेवरती जेवणाची, दारुची व इतर सोयी सुविधा पुरविल्या जातात, अक्कलकोट तालुक्यात हैद्रा, अक्कलकोट स्टेशन, नागणसुर, तोळणुर इ. ठिकाणी जुगार अड्डे राजरोसपणे सुरु आहे.
* पोलिसांचे कारवाई करण्यास टाळाटाळ व बोगस कारवाई *
तालुक्यातील सर्व जुगार अड्डा बंद करण्यास पोलिसांनी टाळाटाळ करतात व बोगस कारवाई करतात, या पोलिस अधिकारी पैसे खाऊन गप्प बसतात आणि बोगस कारवाई करतात आणि एका तासात पुन्हा जुगार अड्डा चालु होतात. तसेच दुधनी शहरात माझे परवाना असताना देखील दुधनी शहरात 50ते 60लोक घरपोच अवैध दारु विक्री करतात यांना पोलिसांनी का पकडत नाही, दुधनीतील अवैध दारु धंदे बंद करावे तसेच तालुक्यात हैद्रा चे दर्गा जिल्हात प्रसिद्ध दर्गा म्हणून ओळखले जाते या दर्गाचे पाठीमागे मोठी जुगार अड्डा चालते त्यामुळे लवकरात लवकर वरिष्ठ पोलिस अधिकारी याची दखल घेऊन संबंधितास कठोर कारवाई करावी अन्यथा अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल अशी कडक इशारा शिवसेना ( शिंदे गट) चे नेते शंकर म्हेत्रे यांनी मुलाखतीत सांगितले आहे.