गळोरगी येथे आपदा मित्रांना प्रशिक्षण
*तहसीलदार विनायक मगर रावसाहेब यांच्या उपस्थित प्रशिक्षण*
अक्कलकोट / प्रतिनिधी- प्रविणकुमार बाबर
सध्या अक्कलकोट तालुक्यासह महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवलेला असून, अक्कलकोट तालुक्यात अनेक ठिकाणी गावचे संपर्क तुटणे, शेती पिकांचे नुकसान यासारखी अवस्था पाहवयास मिळत असताना त्याच पार्श्वभूमीवर सध्या तालुक्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती व भविष्यातील उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता पूरग्रस्त भागात आपदा मित्र हे बाहेरून मागवून घेण्यात येत होते. त्याच अनुशघाने आपल्या तालुक्यातील आपदा मित्र यांना प्रशिक्षण देऊन, तालुक्यात उद्भवलेल्या पूरग्रस्त लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याकरिता व विविध बाबतीत चे प्रशिक्षण देऊन आपदा मित्रांच्या माध्यमातून तातडीची मदत करता येईल, त्याच अनुषंगाने आज गळोरगी तलावात प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणाला तहसीलदार श्री विनायक मगर साहेब, महसूल नायब तहसीलदार संजय भंडारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान, पुरात अडकलेल्या लोकांना काढायचे कसे पपलू आयडिया, पोहताना दम लागल्यास कसा दम काढणे, बोट फिटिंग कशी करायची, बोटी संदर्भात अनेक वेगवेगळ्या माहिती या दरम्यान शिकवण्यात आली असून, बोट कशी चालवणे व इतर अनेक बाबी या दरम्यान शिकवण्यात आल्या.
दरम्यान, गळोरगी ग्रामस्थांच्या वतीने अक्कलकोट चे तहसीलदार श्री विनायक मगर रावसाहेब व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले साहेब, व महसूल नायब तहसीलदार संजय भंडारे रावसाहेब यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी, सर्व सर्कल साहेब, सर्व तलाठी साहेब, सर्व महसूल सेवक, सर्व पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
अक्कलकोट तालुक्यात सध्या पावसाने जोर धरला असल्या कारणाने तालुक्यातील काही भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते त्यावेळी, आपण बाहेरून आपत्ती व्यवस्थापन ची मागवायचो, आता आपण तालुक्यातच हि टीम तयार केल्याने पूरग्रस्त लोकांना तातडीची मदत मिळणे हे शक्य होईल.
तहसीलदार - विनायक मगर, अक्कलकोट.
----------------------------------------------
अक्कलकोट तालुक्यातील आपदा मित्र महसूल सेवक
प्रवीणकुमार बाबर, जाकीर कागदे, प्रविण गुंजले, हणमंत सानप, अनिल जमादार, अवधूत पुजारी, शिवशरण कोळी, शिवानंद कोळी, सचिन व्हनझेंडे, हणमंत जाधव, पोलीस पाटील श्रीशैल पाटील, दयानंद पुजारी, जर्दनबाशा कुमठे, शिवाजी कोरे, विजय चव्हाण.