कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील तालिकोटे तालुक्यातील फिरापूर गावातील शेतकरी देवप्पा रायप्पा हलन्नवर यांनी सकाळी सुमारे ९ वाजता गावाजवळील शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
माहितीनुसार, त्यांनी शेतीच्या लागवडीसाठी तसेच वृद्ध सासूच्या उपचारासाठी कोडगनूर येथील एसबीआय बँकेकडून २६ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. याशिवाय, शेती आणि घराच्या गरजांसाठी त्यांनी गावातील इतरांकडून सुमारे ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून पिकांचे उत्पादन समाधानकारक न झाल्यामुळे त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. वाढत्या आर्थिक अडचणी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी मृताचे पत्नी सुशीलम्मा हलन्नवरा यांनी तालिकोटे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
