Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

पत्रकार दिपक शिंत्रे यांना पत्रकार भूषण गौरव पुरस्कार

Responsive Ad Here

 पत्रकार दिपक शिंत्रे यांना पत्रकार भूषण गौरव पुरस्कार








सोलापूर/ प्रतिनिधी 

स्टार न्यूज सोलापूरच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या चार जणांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

रविवार दिनांक ७ जून 2026 रोजी सकाळी 11वाजता जुळे सोलापूर येथील कमला शांती पॅलेस येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती स्टार न्यूज सोलापूरचे मुख्य संपादक नंदकुमार वारे यांनी दिली आहे.

 या पुरस्कार वितरण सोहळ्यात  दैनिक नवराष्ट्रचे पत्रकार संतोष अचलारे, *विजयपुरचे पत्रकार दीपक शिंत्रे* कर्देहळळी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका सविता पाटील, औज मंद्रूपचे प्रगशील शेतकरी श्रीशैल नरसगोंडे या चार जणांना  जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सोलापूरचे सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजन माने. सोलापूर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे  यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असल्याचीही माहिती नंदकुमार वारे यांनी दिली आहे.