Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने ७ जून रोजी जिल्हास्तरीय मेळावा

Responsive Ad Here


कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने ७ जून रोजी जिल्हास्तरीय मेळावा








विजयपूर / प्रतिनिधी-दिपक शिंत्रे 

कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शहरातील केकेएमपी समुदाय भवन येथे जिल्हास्तरीय मेळावा तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ३९९ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे**, अशी माहिती केकेएमपीचे जिल्हाध्यक्ष भीमाशंकर शिवाळकर यांनी दिली.

  शहरातील केकेएमपी समुदाय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, या कार्यक्रमाचे दिव्य सान्निध्य बेंगळुरू येथील वीरंपूरमधील गोसाई मठाचे श्री मंजुनाथ भारती स्वामीजी लाभणार असून, संघटनेचे राज्याध्यक्ष एस. सुरेशराव साठे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. कार्यक्रमाला मंत्री एम. बी. पाटील, शिवानंद पाटील, खासदार रमेश जिगजिणगी, गोविंद करजोळ, जिल्ह्यातील सर्व आमदार, विधान परिषदेचे सदस्य तसेच कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद (केकेएमपी) चे सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

   समाजातील युवा पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र दर्शविणारे विशेष वस्तुसंग्रहालय उभारण्यात येत असून समाजाचे तळागाळापासून संघटन करण्याच्या हेतूने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये परिषदेच्या तालुका समित्यांच्या शाखा सक्रिय करण्यात आल्या आहेत. या समारंभात समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती, वृद्धापकाळ पेन्शन, दिव्यांग पेन्शन तसेच विधवा पेन्शनचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच दि. ७ जून रोजी याच ठिकाणी राज्य पदाधिकारांची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याध्यक्ष एस. सुरेशराव साठे यांच्यासह सर्व जिल्ह्यांतील ७० हून अधिक पदाधिकारी या  बैठकीस उपस्थित राहणार आहेत.  राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पदाधिकारी तसेच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, तत्त्वे आणि आदर्श यांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात समाजाच्या हक्कांसाठी मागण्या मांडण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, नोकरीच्या संधींसाठी तसेच उच्च शिक्षणासाठी विविध मागण्या शासनाकडे सादर करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  पत्रकार परिषदेत प्रमुख कार्याध्यक्ष रामू जाधव

 सुरेश जाधव, रामू जगताप, संजय जाधव, रमेश गायकवाड, रमेश बीळगी, महादेव पवार, सागर घोरपडे, तुकाराम घोरपडे, संतोष पवार आणि सुधीर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.