Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

चडचाण तालुक्यातील गोविंदपूर हत्याकांड प्रकरणी १२ आरोपींना अटक

Responsive Ad Here


चडचाण तालुक्यातील गोविंदपूर हत्याकांड प्रकरणी १२ आरोपींना अटक











विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे दि. २९ मे शुक्रवारी रोजी एकाच कुटुंबातील पाच व त्याचा सहकारी असे एकूण सहा जनांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आज 12 आरोपींना अटक केली आहे. 

  महासिद्धा श्रीमंत बिरादार, वय 44 वर्षे,  रा. गोविंदपूर, महेश लक्ष्मण बिरादार, वय 22 वर्षे,  रा. गोविंदपूर , राजकुमार सिद्धाराम कोळी, वय 28 वर्षे, –रा. सिद्धापूर (महाराष्ट्र)

राजू चंद्रकांत उगर, वय 20 वर्षे, रा. गोविंदपूर

यल्लप्पा महादेव अरकेरी, वय 25 वर्षे,  रा. गोविंदपूर

कल्लणगौडा ईश्वरगौडा पाटील, वय 65 वर्षे,  रा. गोविंदपूर

लायप्पा नेनप्पा बिरादार, वय 65 वर्षे, रा. गोविंदपूर

सुभाष महासिद्धा बिरादार, वय 21 वर्षे,  रा. गोविंदपूर

रावसाब अवधूत बिरादार, वय 20 वर्षे, रा. गोविंदपूर

गजानंद भुताळे बिरादार, वय 20 वर्षे, रा. गोविंदपूर

मलकारी हनमंत कोळी, वय 18 वर्षे,  – रा. उमदी (महाराष्ट्र)संजू महादेव अरकेरी, वय 31 वर्षे, रा. गोविंदपूर अशी त्यांची नावे असून त्या सर्वांना इंडी न्यायालयासमोर हजर करून पोलीस कस्टडीत घेण्यात आले असल्याचे माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली आहे. 

  प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असून विशेष तपास पथकाची रचना करण्यात आली आहे. 

चैतन्यकुमार निराळे याने नावासह १२ व इतर जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती त्यापैकी आज तिघांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे, 

या हत्याकांड प्रकरणात २० ते २२ जनांचा सहभाग असावा अशी शक्यता आहे. 

  या प्रकरणातील कल्लणगौड पाटील याचा परवानगी असलेल्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्याचे तपासात दिसून आले असून  शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल मृत्यू पैकी दोघांच्या शरीरात गोळ्या आढळून आले असून अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.