Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

इंडीचे आमदार यशवंतरायगौडा पाटील यांना मंत्रीपद द्यावे : आदीबनजगा समाजाची मागणी

Responsive Ad Here



इंडीचे आमदार यशवंतरायगौडा पाटील यांना मंत्रीपद द्यावे : आदीबनजगा समाजाची  मागणी







विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

विजयपूर जिल्ह्यातील इंडी विधानसभा मतदारसंघाचे  आमदार यशवंतरायगौडा पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी आदिबनजगा समाजाचे अध्यक्ष सोमलींग कटावे व पदाधिकारांनी केली आहे. 

पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, पक्ष संघटना बळकट करणे, विकासकामांचा धडाका आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यामुळे यशवंतरायगौडा पाटील हे मंत्रीपदासाठी सक्षम नेतृत्व असल्याचे समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले

आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ काम करत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. ते तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले असून त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदही यशस्वीपणे भूषविले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुभवाच्या जोरावर त्यांनी ग्रामीण भागातील विकासाला गती दिली.


त्यानंतर त्यांनी इंडी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा विजय मिळवत आपले जनाधार अधिक मजबूत केला. अनेक वर्षांपासून रखडलेला भीमाशंकर साखर कारखाना सुरू करुन या भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे मतदारसंघातील रस्ते, पिण्याचे पाणी, सिंचन, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी विकासाभिमुख नेतृत्वाची ओळख निर्माण केली आहे.

  विशेष म्हणजे, आजपर्यंत इंडी विधानसभा मतदारसंघाला राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. त्यामुळे या भागातील जनतेमध्ये नाराजी असून, यावेळी इंडी मतदारसंघाला मंत्रीपदाच्या माध्यमातून न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


यशवंतरायगौडा पाटील यांनी मतदारसंघातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम केले असून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांवर भर दिला आहे. शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळात स्थान दिल्यास विजयपूर जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकाच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास आदिबनजगा समाजाच्या पदाधिकारांनी व्यक्त केला 

  काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय व राज्य स्तरावरील वरिष्ठांनी इंडी मतदारसंघाच्या भावना लक्षात घेऊन यशवंतरायगौडा पाटील यांना मंत्रीपदाची संधी द्यावी, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

 याप्रसंगी परशुराम चिंचली, सुरेश परगौंडे, मल्लिकार्जुन बिजरगी, प्रेमानंद हत्ती उपस्थित होते.