Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

बीएसएनएल नेटवर्कसमस्येमुळे नागरिकांना होणारा त्रास तातडीने दूर करावा - खा. जिगजिनगी

Responsive Ad Here



बीएसएनएल नेटवर्कसमस्येमुळे नागरिकांना होणारा त्रास तातडीने दूर करावा - खा. जिगजिनगी








विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

बीएसएनएल नेटवर्क  समस्येमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून, ही समस्या तातडीने दूर करण्यासाठी मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे, असे खासदार रमेश जिगजिणगी यांनी सांगितले आहे.

   याबाबत प्रसिद्धीपत्रकात  त्यांनी म्हटले आहे की, विजयपूर शहरातही बीएसएनएल नेटवर्कची समस्या गंभीर स्वरूप धारण केली असून अनेक ग्राहकांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ग्राहकांनी ही समस्या माझ्या निदर्शनास आणून दिली आहे.

   या पार्श्वभूमीवर हा विषय गांभीर्याने घेत संबंधित अधिकाऱ्यांना मी चांगलेच फैलावर घेतले आहे. “आज दूरसंचार सेवा ही जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. केवळ संपर्कासाठीच नव्हे, तर दैनंदिन व्यापार-व्यवहार देखील इंटरनेटवर आधारित झाले आहेत. सामान्य नागरिकदेखील यूपीआयद्वारे पेमेंट सर्रास करत आहेत. अशा परिस्थितीत नेटवर्क नसल्यामुळे ग्राहकांना किती मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, याची तुम्हाला जाणीव नाही का?” असा सवालही अधिकाऱ्यांना केला असल्याचे त्यांनी सांगितले.

  सदर तांत्रिक अडचण लवकरात लवकर दूर करण्यात येईल, अशी हमी संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचेही खासदार रमेश जिगजिणगी यांनी स्पष्ट केले आहे.