Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

मंत्री पदापासून वंचित इंडी विधानसभा मतदारसंघ

Responsive Ad Here




मंत्री पदापासून वंचित इंडी विधानसभा मतदारसंघ

 १५ निवडणूका झाल्यातरी एकाही आमदाराला मंत्री स्थान नाही









विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवरील इंडी विधानसभा मतदारसंघाची स्थापना १९५७ मध्ये झाली. १९५७, १९६२, १९६७, १९७२, १९७८, १९८३, १९८५, १९८९, १९९४, १९९९, २००४, २००८, २०१३, २०१८ आणि २०२३ अशा एकूण १५ विधानसभा निवडणुका या मतदारसंघात झाल्या आहेत.

 या काळात सात वेगवेगळे आमदार निवडून आले. त्यापैकी आजपर्यंत एकाही आमदारांना कर्नाटकच्या मंत्री मंडळात स्थान मिळाले नाही. 

 नुकतेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ३ जून रोजी डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्री मंडळाची रचना होणार आहे. यावेळी तर इंडी विधानसभा मतदार संघातील सतत तीन वेळा विजयी झालेले विद्यमान आमदार यशवंतरायगौडा पाटील यांना मंत्रीपद मिळणार का ❓, आज पर्यंत इंडी विधानसभा मतदारसंघावर झालेल्या अन्याय दूर होणार का ❓ अशी चर्चा  सुरू आहे. 


मागील पंढरा निवडणूकमध्ये मल्लप्पा करबसप्पा सुरपूर,   आर. आर. कल्लूर, रविकांत पाटील, आणि यशवंतरायगौडा पाटील हे प्रत्येकी तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. ,, एन. एस. खेड आणि डॉ. सार्वभौम बगली  गवसिद्धपगौडा पाटील हे प्रत्येकी एकदा विधानसभेत निवडून गेले. मात्र, या सर्वांपैकी एकालाही राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.


विजयपूर जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी सात  मतदारसंघांतून मात्र अनेकांना मंत्रीपद मिळाले आहे. राखीव नागठाण (पूर्वीच्या बळ्ळोळी) रमेश जिगजिणगी, सिंदगीमधून एम. सी. मनगुळी व आर. बी. चौधरी, विजयपूर शहरातून एम. एल. उस्ताद, तिकोटामधून बी. एम. पाटील व एम. बी. पाटील, बसवनबागेवाडीमधून बी. एस. पाटील सासनूर, बी. एस. पाटील मनगुळी व शिवानंद पाटील, मुददेबिहाळमधून जे. एस. देशमुख, तसेच हुविनहिप्परगीमधून शिवपुत्रप्पा देसाई यांच्यासह जिल्ह्यातील विविध मतदारसंघांतील नेत्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली. परंतु इंडी मतदारसंघाला मात्र आजपर्यंत मंत्रीपदाचा मान मिळालेला नाही.

  १९५७ मध्ये मल्लप्पा सुरपूर यांच्या काळात निजलिंगप्पा आणि बी. डी. जत्ती यांची सरकारे होती. १९६२ मध्ये एस. आर. कांती यांच्या मंत्रिमंडळाच्या काळात गविसिद्धप्पगौडा पाटील आमदार होते. त्यानंतर वीरेंद्र पाटील, देवराज अर्स, गुंडू राव, रामकृष्ण हेगडे, एस. आर. बोम्मई, एस. एम. कृष्णा, वीरप्पा मोईली, एस. बंगारप्पा, एच. डी. देवेगौडा, जे. एच. पटेल, एच. डी. कुमारस्वामी, बी. एस. येडियुरप्पा, डी. व्ही. सदानंद गौडा, जगदीश शेट्टर, बसवराज बोम्मई आणि सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळातही इंडी मतदारसंघातील आमदारांना मंत्रीपद मिळाले नाही.


सध्या होणाऱ्या मंत्रिमंडळात इंडीचे आमदार यशवंतरायगौडा पाटील यांना मंत्रीपदाची संधी मिळणार का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

 विद्यमान आमदार यशवंतरायगौडा पाटील हे २०१३,२०१८ व २०२३ असे तीन वेळा काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून विजयी झाले आहेत त्यांच्या दोन वेळेचा कालावधीत राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार होते तरीही त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही

एकंदरीत, राज्यातील २२४ विधानसभा मतदारसंघांपैकी इंडी हा असा मतदारसंघ ठरला आहे, ज्याला आजपर्यंत मंत्रीपदाचा मान मिळालेला नाही. त्यामुळे हा मतदारसंघ "मंत्रीपदापासून वंचित राहिलेला मतदारसंघ" म्हणून ओळखला जात आहे.