बागलकोटमधील नवनगर वस्तुसंग्रहालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
विजयपूर/ प्रतिनिधी-दिपक शिंत्रे
बागलकोट येथील नवनगर परिसरातील वस्तुसंग्रहालयात एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला नोकरीवरून काढून टाकल्याच्या नैराश्यात होती. त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.