लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने तरुणाचा टॉवर वर
चढून हायड्रामा
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने एका तरुणाने नैराश्यातून मोबाईल टॉवरवर चढून हायड्रामा केल्याची घटना सोमवारी तिकोटा तालुक्यातील कोट्याळ गावात घडली.
कोट्याळ गावातील श्रीशैल नागप्पा रामतीर्थ या तरुणाने मोबाईल टॉवरवर चढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी श्रीशैल याची समजूत काढून त्याला सुरक्षितपणे टॉवरवरून खाली उतरवण्यात यश मिळवले.
या तरुणाने टॉवरवर चढण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही दारू आणि गुटखा मिळावा या मागणीसाठी त्याने दोन वेळा मोबाईल टॉवरवर चढण्याचा प्रकार केला होता.
त्यावेळीही पोलीस आणि अग्निशमन दलाने त्याची समजूत काढून खाली उतरवले होते.
वारंवार मोबाईल टॉवरवर चढून हा तरुण गोंधळ घालत असल्यामुळे सार्वजनिक वर्तुळात त्याची खिल्ली उडवली जात आहे.
