Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

घराचे छत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू

Responsive Ad Here



घराचे छत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू









विजयपूर/ प्रतिनिधी-दिपक शिंत्रे 

घराचे छत कोसळून एका महिलेचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे जिल्ह्यातील निडगुंदी येथील गौरीश्वर मंदिराजवळ घडली. 

   निडगुंदी येथील रहिवासी महादेवी वारद (वय ५५) या मृत महिलेचे नाव आहे.

  दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जुने घर ओले झाले होते. त्यामुळे पहाटेच्या सुमारास घराचे छत अचानक कोसळून महादेवी या ढिगाऱ्याखाली जिवंत गाडल्या गेल्या.

  घराच्या बाहेर झोपलेले त्यांचे पती शिवानंद हे मात्र थोडक्यात बचावले.

  घटनास्थळी निडगुंदी पोलिस तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

  महादेवी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

  घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश हृदयद्रावक होता.

ही घटना निडगुंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.