Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

मराठा समाजाच्या सांस्कृतिक भवनास अनुदान मंजूर करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन

Responsive Ad Here



 मराठा समाजाच्या सांस्कृतिक भवनास अनुदान मंजूर करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 विजयपूर येथील मराठा समाज  सेवा समितीच्या सांस्कृतिक भवन बांधकामासाठी दोन कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात यावे असे निवेदन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे

    विजयपूर मराठा समाज प्रमुखांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, 

  मा. आदरणीय उपमुख्यमंत्री, आपण महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी जो प्रयत्न करीत आहात, तो अभिमानास्पद आहे. 

कर्नाटकातील  विजयपूरात मराठा समाज , सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या खूप मागासलेला आहे आणि आमच्या समाजाच्या प्रगतीसाठी समाजाच्यावतीने शहरात सांस्कृतिक भवनाचे बांधकाम सुरू आहे  आणि तो पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.

  यासाठी, सदरिल स्थान महालबागायत एस. नं. 741/E प्लॉट नं. 35 व 36 या जागेवर नेताजी सुभाषचंद्र बोस चौक जवळ,  विजयपूर येथे नवीन समाज भवन बांधकाम सुरू करण्यात आले आहे.


आमच्या स्थानिक मराठा समाज सांस्कृतिक सेवा समितीला समाज भवनाच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात यावे, अशी कळकळीची विनंती मराठा समाजाच्या वतीने आपल्याकडे करण्यात येत आहे असे निवेदनात म्हटले आहे. 

 या प्रसंगी मराठा समाजाचे अध्यक्ष विजयकुमार चव्हाण, सेक्रेटरी व विजयपूर महानगर पालिका सदस्य राहुल जाधव, 

तानाजी जाधव, नितीन पवार, आनंद सुर्यवंशी व इतर उपस्थित होते.