Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

गोविंदपूर हत्या प्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Responsive Ad Here



 गोविंदपूर  हत्या प्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

काल शुक्रवारी दुपारी सुमारे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर गावातील शेतजमिनीत भीषण हत्याकांड घडले. या घटनेत सहा जणांची हत्या करण्यात आली. मृतांमध्ये दुंडप्पा निराळे (६५), भाऊ शिवपुत्र निराळे (५८), चंद्रकांत निराळे (५५), शिवपुत्र यांचे पुत्र राहुल निराळे (२५) व समर्थ निराळे (२३), तसेच शिवपुत्र यांचे सहकारी शब्बीर अत्तार (४५) यांचा समावेश आहे.


या घटनेत त्यांच्यासोबत असलेले अरविंद कटगे आणि जेसीबी ऑपरेटर संदीप माने हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विजयपूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  घटनेच्या पार्श्वभूमीकडे पाहिल्यास, २०१५ मध्ये गोविंदपूर येथील शिवानंद तळवार यांनी तेली समाजातील एका तरुणीचे अपहरण करून नेल्याचा प्रकार घडला होता. यामुळे संतप्त झालेल्या शशिकांत तेली, प्रशांत तेली, कामनिंग तेली आणि महादेव तेली यांनी शिवानंद तळवार यांची हत्या केली होती. या प्रकरणात संबंधितांनी तुरुंगवासाची शिक्षाही भोगली होती.

  त्या घटनेनंतर तेली कुटुंबीयांनी गोविंदपूरमधील आपली शेती सोडून अन्यत्र वास्तव्य केले होते. त्यानंतर ही जमीन अनेक वर्षे पडीत राहिली होती. शेती न केल्याने ती जमीन विकत घेण्यात आली होती का, आणि त्याच कारणावरून हा हल्ला झाला का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

   दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी संदीप पाटील यांनी विजयपूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणाचा संबंध चडचाण पोलीस ठाण्यातील २०१५ मधील गुन्हा क्रमांक १५६/२०१५ (कलम ३०२ आयपीसी) शी असू शकतो. त्या प्रकरणातील फिर्यादी कल्लणगौड ईश्वरगौड पाटील यांच्या गटातील व्यक्तींचा या हत्याकांडाशी संबंध असण्याची शक्यता असून तपास सुरू आहे.

  याचदरम्यान, चडचाण येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

   या प्रकरणी चैतन्यकुमार निराळे यांनी चडचाण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामध्ये कल्लणगौड ईश्वरगौड  पाटील, अप्पुगौड लगमगौड पाटील, ईश्वरप्पा लगमगौड पाटील, प्रकाश बसवराज  पाटील, प्रशांत बसवराज पाटील, सिद्धराम कल्लणगौड पाटील, लयप्पा नेमप्पा बिरादार, चिदानंद नामंदेव कोळी, मशीदा श्रीमंत बिरादार,  श्रीमंत शंकरप्पा बिरादार, शंकरप्पा महादेव अरकेरी आणि अप्पासाहेब शंकर भोवी यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.


पोलीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथके नियुक्त करून शोधमोहीम सुरू केली आहे.