Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

संतोष पटकारे झाले ऑल इंडिया धनगर समाज महासंघ चे मुंबई प्रदेश अध्यक्ष

Responsive Ad Here

 संतोष पटकारे झाले ऑल इंडिया धनगर समाज महासंघ चे मुंबई प्रदेश अध्यक्ष 







मुंबई /विशेष प्रतिनिधी -

                                 संतोष महादेव पटकारे रा पाचल ता राजापूर जि रत्नागिरी. सध्या राहणार विलेपार्ले मुंबई यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली चे मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे ही निवड प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांनी केली आहे.  ही निवड मुंबई येथे चेंबूर येथील स्वामी विवेकानंद काॅलेज  पटांगणात कै भरत बोडेकर यांचे स्मरणार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिले आहे...या प्रसंगी विजय कोकरे राज्य संघटक ऑल इंडिया धनगर गणेश गोरे सुनील गोरे परेश गोरे  मारुती झोरे पांडुरंग काळे मनोहर कोकरे पांडुरंग गोरे गणेश शेळके संतोष खुटेकर प्रकाश देसाई संजय झोरे संदीप झोरे इत्यादी उपस्थित होते समाज महासंघ महाराष्ट्र राज्य नवलराज काळे कोकण प्रदेश अध्यक्ष युवा आघाडीचे संतोष पटकारे हे प्रत्येक वर्षी सामाजिक व शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक वर्षी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप महिलांना मदत क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मदत करत असतात गेले १० ते १२ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे धनगर समाजाचे प्रत्येक कार्यक्रम ला आवर्जून उपस्थित राहुन सहकार्य करत असतात अशा या सामाजिक नेतृत्वाला संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे