Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

निर्दयी आईने नवजात बाळाला टाकून दिले

Responsive Ad Here



निर्दयी आईने नवजात बाळाला टाकून दिले







  विजयपूर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 जिल्हातील ताळिकोटे शहरात नुकतेच जन्मलेल्या आपल्या नवजात बाळाला एका आईने लिंगायत कैलासधामजवळ टाकून दिल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

  शहरातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळील वीरशैव कैलासधाम परिसरात ही घटना उघडकीस आली.

 टाकून दिलेले बाळ हे मुलगा मृत्यू अवस्थेत आढळून आले असून त्याचा जन्म फक्त एक दिवसापूर्वीच झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे बाळ अवैध संबंधातून जन्मले असावे, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

   अनेक जणांना मूल होत नाही म्हणून देवदेवतांना नवस करून फिरताना आपण पाहतो; मात्र येथे एका आईने स्वतःच्या पोटच्या लेकराला अशा प्रकारे टाकून दिल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

टाकून दिलेल्या बाळाच्या उजव्या पायाला कुत्र्यांनी ओढून खाल्ले होते. बाळाची अवस्था अत्यंत विदारक होती; शरीराचा काही भाग उघडाच राहिला होता आणि त्यावर मुंग्या लागल्या होत्या.

 दुपारच्या सुमारास १२ वाजण्याच्या सुमारास एक कुत्रा हे बाळ ओढत नेत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ कुत्र्याला हाकलून लावून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पीएसआय एस. एम. पडशेट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रकरण नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.