Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

बाईक अपघातात बाईकस्वारांचा जागीच मृत्यू

Responsive Ad Here


बाईक अपघातात बाईकस्वारांचा जागीच मृत्यू







विजयपूर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

दोन बाईकची समोरासमोर धडक झाल्यामुळे दोन्ही बाईकस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील मसबिनाळ जवळ घडली आहे

इंगळेश्वर तांडा येथील संतोष लालू चव्हाण (वय 32) आणि देगिनाळ गावचे भीमनगौडा पाटील (वय 45) हे मृत्यूमुखी पडलेले दुर्दैवी व्यक्ती आहेत.

या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून जखमीस उपचारासाठी बसवनबागेवाडी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  घटनास्थळी मनगूळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

ही घटना मनगूळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.