Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

कन्नोळी टोलगेटजवळ भीषण दुर्घटना

Responsive Ad Here



सिंदगीजवळ भीषण रस्ते अपघात

आगीच्या ज्वाळांमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू

बसलाही आग

थोडक्यात प्रवासी बचावले

कन्नोळी टोलगेटजवळ भीषण दुर्घटना










विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 जिल्ह्यातील सिंदगीजवळ आज अंगावर काटा आणणारा भीषण अपघात घडला असून सरकारी  बस (के.ऐ. २८ एफ २०९५) आणि दुचाकी ( के. ऐ. २८ एच के. २५५१) यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच जिवंत जळून मृत्यू झाला असून संपूर्ण बसला आग लागली. 

 विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यात कन्नोळी टोलगेटजवळ झालेल्या या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. देवऱ्हिप्परगी तालुक्यातील मुळसावळगी गावचा रहिवासी अभिषेक सायबागौडा नागराळ (वय २२) हा दुर्दैवी युवक आगीच्या ज्वाळांत सापडून जिवंत जळाला.

 धडकेच्या तीव्रतेमुळे दुचाकीच्या पेट्रोल टँकचा स्फोट होऊन आग लागली, त्यामुळे दुचाकीस्वाराला सावरण्याची संधीच मिळाली नाही. अपघात इतका भीषण होता की काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.

  सुदैवाने, आग बसमध्ये पूर्णपणे पसरायच्या आधीच चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि प्रवाशांच्या तत्काळ बाहेर पडण्यामुळे बसमधील सर्व प्रवासी बचावले.

 घटनास्थळी पोहोचलेल्या सिंदगी अग्निशामक दलाने आग विझवण्यात यश मिळवले. सिंदगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.