Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

गणपती थावरू पवार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

Responsive Ad Here

  गणपती थावरू पवार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त







दुधनी/ प्रतिनिधी 

 कर्नाटक राज्य ज्ञानविज्ञान समिती बेंगळुर यांच्याकडून देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींची शाळा दुधनी येथील कर्तव्यदक्ष, विद्यार्थीप्रिय, सतत गोरगरिबांचे मुलांच्या गुणावत्ता वाढीसाठी तळमळीने झटणारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास जोपासणारे, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, विद्यार्थी प्रिय, उपक्रमशील शिक्षक  गणपती थावरू पवार यांना कर्नाटक ज्ञानविज्ञान समिती बेंगळूरु विजयपुर जिल्हा घटक यांच्या वतीने ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कर्नाटक राज्य ज्ञानविज्ञान समितीचे राज्यसचिव  ई. बसवराजु यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कर्नाटक राज्य एस.सी.एस.टी.समन्वय समितीचे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत होसमनी, अर्जुन निरगुंदे के.जी व्ही.एस. अध्यक्ष श एस.कांबळे कार्यदर्शी,  रमेश नायक, गौरवाध्यक्ष  प्रभूगौड पाटील ,  बसवनगौड हरनाळ संस्थापक अध्यक्ष कायकयोगी ग्रामीण शिक्षण संस्था तीडगुंदी आधी उपस्थित होते. 

 या पुरस्काराबद्दल माननीय गटशिक्षणाधिकारी  प्रशांत आरबाळे विस्तार अधिकारी  सोमसेखर स्वामी, लक्कप्पा पुजारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ जयश्री विलास पोतदार, सर्व सभासद मुख्याध्यापक  महादेव बासरगाव सर्व गावकरी व पालक विद्यार्थ्यांकडून कौतुक होत आहे.