वीरशैव पंचमसाली शासकीय नोकर महासभा, यांच्याकडून एस.एस.एल.सी. व पी.यू.सी. विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा पुरस्कार अर्जासाठी आव्हान
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
वीरशैव पंचमसाली शासकीय नोकर महासभा, जिल्हा शाखा विजयपूर यांच्या वतीने, एस.एस.एल.सी. मध्ये किमान ८५% व पी.यू.सी. मध्ये किमान ९०% गुण मिळवलेल्या पंचमसाली समाजातील विद्यार्थिनी/विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा पुरस्कार अर्ज मागविण्यात येत आहेत.
२०२४–२५ या शैक्षणिक वर्षात एस.एस.एल.सी. व पी.यू.सी. मध्ये उत्तम गुण मिळवलेल्या समाजातील विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच समाजातील विशेष यश प्राप्त केलेल्या व्यक्तींनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी अर्ज पाठवण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांची गुणपत्रिका (मार्कशीट) व एक छायाचित्र (फोटो) **सप्टेंबर २१** पर्यंत खालील मोबाईल क्रमांकावर पाठवावे:
**९९००६६३३७८**