भावसार सोसायटीच्या अध्यक्षपदी राजेश देवगिरी, उपाध्यक्षपदी दीपक शिंत्रे यांची बिनविरोध निवड
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
भावसार क्षत्रिय सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेश देवगिरी, तर उपाध्यक्षपदी दीपक शिंत्रे यांची 2026-2031 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी बिनविरोध निवड झाली असल्याचे घोषणा निवडणूक अधिकारी ए.एस. कन्नूर यांनी केली.
सोसायटीच्या कार्यालयात बिनविरोध निवड झालेल्या संचालक मंडळाचे सदस्य वकील अशोक वाय मिरजकर, वकील तुकाराम डी जवळाकर, विजयकुमार एस नवले, श्रीकांत एस देवगिरी, विजय पी सुलाखे, श्रीनिवास एम जवळकर, शशिकुमार ए चौडोहाळ,, श्रीमती. राधाबाई एम देवगिरी, सौ. दीपा जी इजंतकर, सचिव गणेश एस देवगिरी उपस्थित होते.
