विजयपूर जिल्ह्यात भू-कब्जा प्रकरण
आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
*विजयपूर जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांची माहिती*
विजयपूर/ प्रतिनिधी-दिपक शिंत्रे
शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या भू-कब्जा प्रकरणांना गंभीरतेने घेत पोलीस विभागाने २७ प्रकरणांची चौकशी केली असून, आरोपींविरुद्ध न्यायालयात अंतिम अहवाल (दोषारोपपत्र) दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.
शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आदर्शनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १९ प्रकरणांसह कोल्हार, गोलगुंबज, बसवनबागेवाडी, जलनगर, इंडी, सीईएन पोलीस ठाणे आदींच्या हद्दीतील एकूण २७ प्रकरणांची चौकशी करण्यात आली असून, त्यापैकी २५ प्रकरणे उघडकीस आली असल्याचे त्यांनी सांगितले.
या २५ प्रकरणांमध्ये भू-मालकांच्या एकूण १५८ एकर १३ गुंठे जमीन तसेच ९ एनए प्लॉट्स संदर्भात आरोपींनी भू-मालकांचे बनावट आधार कार्ड तयार करून, त्याच्या आधारे आपल्या नावावर खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले, असे एसपींनी स्पष्ट केले.या प्रकरणांच्या चौकशीत एकूण २०० आरोपींविरुद्ध पुरावे उपलब्ध झाल्याने, त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र तयार करून न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, भू-मालकांची १५८ एकर १३ गुंठे जमीन पुन्हा त्यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. यापैकी दोन प्रकरणांत ‘बी’ अंतिम अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
*बॉण्ड रायटरांचा सहभाग*:
आरोपींपैकी काहीजण बॉण्ड रायटर असल्याचे, तर काहीजण कमिशनवर छोटे प्लॉट्स व जमिनींची विक्री करणारे असल्याचे तपासात आढळून आले आहे. जमीन विक्री करून कमिशन घेणारे एजंट तसेच सब-रजिस्ट्रार कार्यालयातील बॉण्ड रायटर कोण जमिनी विकतात, त्या जमिनी कुठे आहेत, यासंबंधीची कागदपत्रेही तपासादरम्यान गोळा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणांमध्ये प्रामुख्याने वयोवृद्ध व्यक्ती, एकटे राहणारे तसेच गावाबाहेर वास्तव्यास असणाऱ्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणांची चौकशी अद्याप सुरू असून, सध्या कस्तुरी कॉलनीतील सुधाकर सदाशिव कमलाकर, इंडी तालुक्यातील हळगुणकी येथील भीमराय चायप्पा कट्टिमनी, धूळखेड येथील सुधाकर सिद्दण्णा चराटे, बंजारा नगरातील काशीनाथ गंगाराम राठोड, तसेच बॉण्ड रायटर दत्तात्रेय एस. शिवशरण, नागप्पा कोलकार, रफीक अब्दुल लतीफ तुर्की, बाबुराव गंगप्पा कोळी, बापू दोंडिबा क्षीरसागर आदींनी गँग तयार करून एकापेक्षा अधिक भू-कब्जा प्रकरणांत सहभाग घेतल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे, असे एसपी लक्ष्मण निंबरगी यांनी
