Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

संशयातून पत्नीने पतीचा गळा आवळून खून केला

Responsive Ad Here



संशयातून पत्नीने पतीचा गळा आवळून खून केला








विजयपूर/ प्रतिनिधी  - दिपक शिंत्रे  

चारित्र्यावर संशय घेत असलेल्या पतीचा पत्नीनेच ओढणीने (वेईल) गळा आवळून खून केल्याची घटना बबलेश्वर तालुक्यातील हळगणीजवळील शेतात घडली आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव शंकप्पा विठ्ठल कुरुबर (वय ३२) असे आहे. आरोपी पत्नी मल्लम्मा हिला अटक करण्यात आली असून बबलेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


**घटनेचा तपशील :**

मूळचे संगापूर गावचे असलेल्या शंकप्पा यांचा विवाह ममदापूर येथील मल्लम्मा हिच्याशी झाला होता. पतीसोबत चार-पाच वर्षे संसार केल्यानंतर या दाम्पत्याला आरती नावाची मुलगी झाली. मात्र काही वर्षांपूर्वी पतीसोबत भांडण झाल्याने मल्लम्मा माहेरी निघून गेली होती.

दोन महिन्यांपूर्वी वडीलधाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर पती-पत्नी पुन्हा एकत्र आले. शंकप्पा आपल्या नातेवाईकांच्या हळगणीजवळील शेतात टिनशेड उभारून पत्नी व मुलीसह वास्तव्यास होते.

काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. पती आपल्यावर संशय घेत असल्यामुळे मल्लम्मा चिडलेली होती.  रात्री झोपेत असताना तिने आपल्या ओढणीने पतीचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले जाते.

सकाळी शंकप्पाचा भाऊ घरी आला असता शंकप्पा पलंगावर मृत अवस्थेत आढळून आला. आईने वडिलांचा खून करताना पाहिल्याचे मुलगी आरती हिने सांगितले आहे.

*एसपी कार्यालयासमोर आंदोलन**

हळगणी येथील शेतात खून झालेल्या शंकप्पाच्या नातेवाईकांसह अडवी संगापूर गावातील नागरिकांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले. या प्रकरणात पत्नी मल्लम्मासोबत आणखी चार जण सहभागी असून त्यांना अटक करून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

मल्लम्माचे गावातील चार व्यक्तींशी अनैतिक संबंध होते. त्याबाबत पतीने जाब विचारल्यामुळेच तिने त्यांच्यासोबत मिळून पतीचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना आठ वर्षांची मुलगी आरती हिने प्रत्यक्ष पाहिल्याचेही सांगण्यात आले आहे.

खून झालेल्या दिवशी बबलेश्वर पोलिसांनी मल्लम्मासह आणखी चार जणांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. मात्र कोणत्या तरी दबावामुळे त्या चार जणांना सोडून देण्यात आले, असा आरोप करण्यात येत आहे. त्यांना तात्काळ अटक करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी मृत शंकप्पाची आई निंबेव्वा विठ्ठल कुरुबर व ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.