Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

श्री उद्यानगणेश कबड्डी स्पर्धा : आंध्रा, मोडक, एनकेईएस व भावे हायस्कूल उपांत्य फेरीत

Responsive Ad Here

 श्री उद्यानगणेश कबड्डी स्पर्धा : आंध्रा, मोडक, एनकेईएस व भावे हायस्कूल उपांत्य फेरीत

मुलींच्या गटात ज्ञानविकास, एसआयईएससह चार संघांची आगेकूच








मुंबई /क्रिडा प्रतिनिधी - बाळ तोरसकर 

मुंबई – श्री उद्यानगणेश मंदिर चषक शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात आंध्रा एज्युकेशन हायस्कूल-वडाळा, ताराबाई मोडक हायस्कूल, विनोबा भावे शाळा आणि एनकेईएस हायस्कूल यांनी दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर मुलींच्या गटात ज्ञान विकास हायस्कूल, एस.आय.ई.एस. हायस्कूल, डॉ. आंबेडकर शाळा आणि गौरीदत्त मित्तल हायस्कूल यांनी उपांत्यपूर्व फेरी जिंकत विजयी मुसंडी मारली.


आंध्राचा सांघिक खेळ निर्णायक :

श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीतर्फे आयोजित मुलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात आंध्रा एज्युकेशन हायस्कूलने श्री गणेश इंग्लिश स्कूलचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. सामन्यात आंध्राच्या खेळाडूंनी एकसंघ खेळ सादर करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले आणि हा सांघिक खेळच विजयी संघासाठी निर्णायक ठरला.


मोडक, एनकेईएस व भावे शाळांची प्रभावी आगेकूच :

अन्य मुलांच्या सामन्यात ताराबाई मोडक हायस्कूलने महिला मंडळ संचालित माध्यमिक विद्यालयाचे आव्हान संपुष्टात आणताना दर्शन तोंडलेकरने चढाईत व प्रथम नाईकने पकडीत उत्कृष्ट खेळ केला. अष्टपैलू तेजस कुंभार व विशाल लोंढे यांना उशिरा सूर सापडल्यामुळे महिला मंडळ शाळेला पराभवास सामोरे जावे लागले. कप्तान स्वराज काशे व वेदांत सकपाळ यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर एनकेईएस हायस्कूलने मुंबई पब्लिक स्कूलचा पराभव केला, तर विनोबा भावे शाळेने सनराईज हायस्कूलवर मात करत उपांत्य फेरी गाठली.


मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत थरार :

मुलींच्या उपांत्यपूर्व फेरीत ज्ञान विकास हायस्कूलने आंध्रा एज्युकेशन हायस्कूलला, एस.आय.ई.एस. हायस्कूलने मावळी मंडळ शाळेला, डॉ. आंबेडकर शाळेने सरस्वती विद्या मंदिरला, तर गौरीदत्त मित्तल हायस्कूलने जवाहर मराठी शाळेला चकवत पुढील फेरीत प्रवेश केला. सामन्यांमध्ये वेगवान चढाया, अचूक पकडी आणि सांघिक समन्वय यामुळे प्रेक्षकांना कबड्डीचा खरा थरार अनुभवता आला.