जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी
विजयपूर / प्रतिनिधी -दिपक शिंत्रे
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सकाळी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा संदेश प्राप्त झाल्याने पोलिसांनी तातडीने सखोल तपास व पाहणी केली.मंगळवारी सकाळी सुमारे 6.58 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाला ई-मेलद्वारे संदेश प्राप्त झाला असून, त्या संदेशात कार्यालयाच्या आवारात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती.या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाच्या बॉम्ब नाशक पथकातील अधिकारी व कर्मचारी तात्काळ श्वान पथकासह घटनास्थळी दाखल होऊन तपासणी केली तसेच शहर विभागाचे डीवायएसपी, डीएआर डीवायएसपी, सीपीआय तसेच गोलगुंबज पोलीस ठाण्याचे पीएसआय यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयाची संपूर्ण तपासणी केली.यामुळे कर्मचारी व नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
