Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

कनेरी स्वामीजी देव, या देवांनी माफी मागावी असे बोलणारांनी हिंदू समाजाची माफी मागावी - के. एस. ईश्वरप्पा

Responsive Ad Here



कनेरी स्वामीजी देव, या देवांनी  माफी मागावी असे बोलणारांनी हिंदू समाजाची माफी मागावी - के. एस. ईश्वरप्पा







विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

* कनेरी स्वामीजी देव, या देवानी माफी मागावी,” असे म्हणणाऱ्यांनी सर्वप्रथम संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी. कनेरी श्रींनी हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्यांना केवळ स्वाभाविक भाषेत उत्तर दिले आहे, एवढेच. कनेरी श्रींच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे,” असे माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी सांगितले.


जिल्यातील बबलेश्वर येथे झालेल्या बसवादी शरण हिंदू समावेशात सहभागी होऊन  भाषण करताना ते म्हणाले, “हिंदू धर्मातील देवदेवतांना नदीत फेकून द्या असे कोणी म्हटले तर आपले रक्त उकळणार नाही का? त्याचप्रमाणे पूज्य श्रींचेही रक्त उकळले आहे. म्हणूनच त्यांनी स्वाभाविक भाषेत टीका केली आहे. स्वामीजींनी कोणत्याही व्यक्तीवर टीका केलेली नाही; हिंदू तत्त्वज्ञानावर टीका करणाऱ्यांविरुद्ध त्यांनी गर्जना केली आहे. श्रींवर बंदी घालण्यामागे जे लोक आहेत, ते याच जन्मात पापाचे फळ भोगतील,” असेही ते म्हणाले.


“अल्लाह किंवा येशू यांच्याविषयी अपमानास्पद बोलले तर ते गप्प बसतील का? मारून टाकतील. आमच्या देवदेवतांचा अपमान करणारे इतर धर्मियांबद्दल असे बोलून दाखवावेत,” असे आव्हानही त्यांनी दिले.

     एका आमदाराने अधिकाऱ्याला चप्पल मारतो असे म्हटले तेव्हा त्याच्यावर बंदी का घातली नाही? तो काँग्रेसचा आहे म्हणून तुम्ही गप्प बसलात का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

  “हिंदू धर्म व हिंदू देवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. हिंदूंना गृहीत धरू नका. हिंदू धर्मावर झालेल्या अन्यायाविरुद्ध येथे प्रचंड जनसमुदाय एकत्र आला आहे. हा केवळ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है,” असे म्हणत त्यांनी जोरदार शब्दांत इशारा दिला.


### *बसवेश्वर हे हिंदू धर्माचे प्रमुख*


“बसवेश्वर हे आमच्या हिंदू धर्माचे प्रमुख आहेत. आम्ही त्यांच्या मार्गावर चालत आहोत, तेच आमचे नेते आहेत,” असे ईश्वरप्पा यांनी सांगितले.

   विनाकारण कनेरी श्रींवर बंदी घालण्यास कारणीभूत ठरलेल्यांना या बबलेश्वरमधूनच जनता बंदी घालेल, असेही ते म्हणाले.

   कर्नाटक सेंद्रिय बीज प्रमाणीकरण संस्थेचे माजी अध्यक्ष विजुगौडा पाटील बोलताना म्हणाले की, समावेशात अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला. रात्री १२ वाजेपर्यंत स्वामीजी येणार नाहीत, लोक जमणार नाहीत, असा अपप्रचार करण्यात आला. मात्र येथे जमलेला प्रचंड जनसमुदायच त्यांना उत्तर आहे, असे त्यांनी सांगितले

   धर्म फोडून राज्य करणाऱ्यांना योग्य धडा शिकवायला हवा. समानता आणि एकतेच्या नावाखाली शपथ घेणाऱ्यांनीच या धार्मिक कार्यक्रमाला अडथळे आणले. तरीही भक्तांनी हा कार्यक्रम यशस्वी करून इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा समावेश घडवून आणला, असेही त्यांनी नमूद केले.


बबलेश्वर बृहन्मठाचे श्री डॉ. महादेव शिवाचार्य हे सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहत असतात. मात्र ते येथे का आले नाहीत, याकडे सूक्ष्मपणे लक्ष द्यावे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.