विजयपूर जिल्यातील बबलेश्वर येथे
बसवादी शरण हिंदू समावेश यशस्वी
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
बबलेश्वर येथे बसवादी हिंदू शरणांचा समावेश अभूतपूर्व उत्साहात पार पडला.
कनेरी श्रींवर प्रवेशबंदी उठल्यानंतर प्रथमच या समावेशाच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतला.
श्री मंचावर येताच भक्तांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. अनेक भक्तांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार केला.
समावेशात सहभागी झालेल्या अनेक सभासदांनी श्रींची भावचित्रे प्रदर्शित केली होती.
महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर तसेच कर्नाटकातील अथणी, बेळगाव, बागलकोट, कोप्पळ आदी अनेक भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक मठाधीशांनी कार्यक्रमाला साक्ष उपस्थित होते
कहाळे व शंखवाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध धान्ये कलशात अर्पण करून वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने समावेशाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपाध्याय यांनी रचलेले *“बसव शैवामध्ये हिंदुत्व”* हे गीत सादर करण्यात आले.
### *उत्साही बाईक रॅली*
समावेशाच्या निमित्ताने विजयपूर शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. दोन हजारांहून अधिक युवकांनी बाईक रॅलीद्वारे सहभाग घेतला.
ही रॅली सारवाडपर्यंत पोहोचली. तेथे हजारो युवक यात्रेत सहभागी झाले.
बबलेश्वर येथील श्री शांतवीर चौकातून चार हजार महिलांनी पूर्णकुंभ डोक्यावर घेऊन मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
अण्णा बसवेश्वर चौक, क्रांतीवीर संगोळी रायण्णा चौक आदी अनेक मार्गांवरून ही कुंभमिरवणूक जाऊन समावेशस्थळी पोहोचली.
सिंदगी सारंगमठाचे श्री प्रभु सारंगदेव शिवाचार्य, मातोश्री योगेश्वरी माताजी, मनगुळीचे श्री गुरु संगनबसव शिवाचार्य यांच्यासह अनेक मठाधीशांनी सान्निध्य लाभवले.
माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी मंत्री शशिकला जोल्ले, माजी मंत्री अप्पासाहेब पट्टणशेट्टी, कर्नाटक सेंद्रिय बीज प्रमाणीकरण संस्थेचे माजी अध्यक्ष विजुगौडा पाटील, उमेश कोळकूर, डॉ. सुरेश बिरादार, रविकांत बगली, राघव अण्णिगेरी, भीमाशंकर हडनूर, संजय पाटील कलमडी आदी मान्यवर उपस्थित होते.
