एएसआयसीएसचा टाटा मुंबई मॅरेथॉनशी १७ वर्षांचा सहप्रवास साजरा
जीईएल-निंबस २८च्या लाँचने २०२६ सीझनची दमदार सुरुवात
इनव्हेशन, परफॉर्मन्स आणि रनिंग संस्कृतीला नवे बळ
जपानी क्रीडावस्त्र ब्रँडचा मुंबईत रंगला भव्य, दमदार आणि उत्साही धडाकेबाज सोहळा
राष्ट्रीय ,मुंबई क्रिडा प्रतिनिधी- बाळ तोरसकर
जागतिक ख्यातीचे जपानी क्रीडावस्त्र ब्रँड एएसआयसीएसने टाटा मुंबई मॅरेथॉन (टीएमएम) सोबतच्या १७ वर्षांच्या भागीदारीचे औचित्य साधत जीईएल-निंबस २८ या नव्या परफॉर्मन्स शूचे भव्य लाँचिंग केले. लिंकिंग रोडवरील एएसआयसीएस स्टोअरमध्ये झालेल्या सोहळ्याला अभिनेता, उद्योजक व फिटनेस आयकॉन दिनो मोरिया यांच्या उपस्थितीने विशेष रंगत आली. टीएमएम २०२६ चे अधिकृत Sports Goods Partner म्हणून एएसआयसीएसने देशातील वेगाने वाढणाऱ्या क्रीडा आणि वेलनेस संस्कृतीशी नाते आणखी दृढ केले.
जीईएल-निंबस™ २८ – टीएमएम २०२६ चे हिरो सिल्हूट
एएसआयसीएसने जागतिक स्तरावर गाजलेली न्यूट्रल कुशनिंग तंत्रज्ञान असलेली जीईएल-निंबस™ २८ शू सादर केली. ढगांवर धावत असल्याचा अनुभव देणारी कुशनिंग, उत्कृष्ट कम्फर्ट आणि शरीर–मन दोन्ही उंचावणारी रचना यासाठी प्रसिद्ध असलेल्या या आवृत्तीत मागील मॉडेलपेक्षा तब्बल २० ग्रॅम हलके बनवले गेले असून अधिक परिष्कृत, नितळ व आरामदायी रनिंग अनुभव देण्यासाठी डिझाइन केले आहे.
टीएमएम २०२६ स्पेशल मर्चन्डाइज – मुंबईच्या कोस्टल रोडची प्रेरणा
या फुटवेअरला पूरक म्हणून एएसआयसीएसने टीएमएम २०२६ लिमिटेड एडिशन एसएम ग्राफिक टी-शर्ट सादर केला आहे. मुंबईच्या नव्या कोस्टल रोडवरून प्रेरित या डिझाइनमध्ये शहराची बदलती वाटचाल, प्रगतीची ओळख आणि जोडणीचे प्रतीक दिसते. रनिंग शूची कलाकृती टी-शर्टवरील ‘मोव्हमेंट’चा प्रेरक रूपक ठरते.
यासोबत २-इन-१ ४-इंच शॉर्ट्स, एअर-फ्लो मेष कॅप, लाईट मेष अँकल सॉक्स असे उच्च-परफॉर्मन्स अपॅरेल व अॅक्सेसरीज सादर करण्यात आल्या असून धावपटूंना प्रशिक्षण आणि रेस डे दरम्यान थंड, कोरडे आणि एकाग्र राहण्यास मदत करतील.
एएसआयसीएस इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. रजत खुराणा:
“भारत परफॉर्मन्स स्पोर्टच्या सुवर्ण दशकात प्रवेश करत आहे. रनिंग ही या वाढीची प्रमुख प्रेरक शक्ती ठरत आहे. टीएमएमसोबतची १७ वर्षांची आमची भागीदारी, निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीला चालना देणाऱ्या प्लॅटफॉर्म्सच्या सामर्थ्यावर आमचा विश्वास दर्शवते. जीईएल-निंबस™ २८चे लॉन्च हे भारतीय धावपटूंना जागतिक स्तरावरील इनोव्हेशन पोहोचवण्याच्या आमच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
प्रोकॅम इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंह:
“टाटा मुंबई मॅरेथॉनच्या प्रवासात एएसआयसीएसचे योगदान अभूतपूर्व आहे. धावपटूंचा अनुभव समृद्ध करण्यासाठी त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रमाचे आकर्षण वर्षागणिक वाढत आहे. टीएमएमच्या २१व्या आवृत्तीची तयारी जोमात सुरू असून संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. मुंबईची जिद्द, आवड आणि अपार ऊर्जा पुन्हा एकदा रस्त्यांवर दिसणार खरा उत्सव!”
मुंबईत जीईएल-निंबस २८ व टीएमएम २०२६ मर्चन्डाइजच्या लाँचसोबत एएसआयसीएसने २०२६ च्या मजबूत व अधिक जोडलेल्या मॅरेथॉन सीझनची सुरुवात केली. या सोहळ्यात देशभरातील धावपटू, भागीदार आणि रनिंग कम्युनिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एएसआयसीएस देशभरात न्यू दिल्ली मॅरेथॉन, बेंगळुरूची टीसीएस वर्ल्ड १०के व २०२५ मधील एनएमडीसी हैदराबाद मॅरेथॉनसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांचे भागीदार म्हणून कार्यरत आहे. नवप्रवर्तन-आधारित साधनसामग्री, कम्युनिटी-फर्स्ट उपक्रम आणि विश्वस्तरीय परफॉर्मन्स वेअरद्वारे ते सर्व स्तरांवरील धावपटू व खेळाडूंना सक्षम बनवत आहे.
टीएमएमचे अधिकृत मर्चन्डाइज मुंबई आणि पुण्यातील निवडक एएसआयसीएस स्टोअर्समध्ये तसेच ऑनलाईन उपलब्ध आहे.
