मातृवंदनेचा महाराष्ट्रात ऐतिहासिक ठसा – ‘आई’ विषयावर 1121 कवितांचा भव्य काव्यग्रंथ प्रकाशन सोहळा 14 डिसेंबरला
पुणे/ प्रतिनिधी
साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन ( सीता ट्रस्ट) यांच्या तर्फे, तसेच संस्थेचे अध्यक्ष मातृ भक्त आचार्य सी ए. प्रा. शंकर अंदानी संकल्पना व यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच आई विषयावर आधारित 1121 कवितांचा अभूतपूर्व काव्यग्रंथ प्रकाशीत होत आहे. एका एकमेव विषयावर इतक्या मोठ्या प्रमाणात साकारलेला हा काव्यसंग्रह राज्यात पहिल्यांदाच वाचकांसमोर येत असल्याने साहित्यविश्वात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या काव्यग्रंथाचे संकल्पनाकार, कवी व संपादक मातृभक्त आचार्य श्री. प्रा. (सी.ए.) डॉ. शंकर अंदानी यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील 500 हून अधिक कवींकडून एकत्रित केलेल्या 1121 कवितांचे संकलन करून हा अनोखा साहित्यिक महोत्सव साकारला आहे. मातृत्वाच्या भावनेला वंदन करणारे हे भव्य काव्यदालन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत सोन्याचा अक्षराक्षर ठसा उमटविणारे ठरणार आहे.
प्रकाशन सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी 2 धर्मगुरू
महामंडलेश्वर श्रीकृष्णगिरीजीमहाराज, तसेच 1008 महामण्डलेश्वर श्री दत्तात्रय दहिवळ महाराज तसेच पद्मश्री श्री दादा साहेब इदाते ,पद्मश्री माजी खासदार श्री विकास महात्मे, पद्मश्री श्री उदय देशपांडे, पद्मश्री सौ राही बाई पोपरे ताई, पद्मश्री श्री पोपट राव पवार साहेब, राज्यसभा खासदार सौ मेघा ताई कुलकर्णी, अहमद नगर चे लोकसभा खासदार श्री नीलेश लंके साहेब, अहिल्या नगर चे आमदार श्री संग्राम जगताप साहेब, तसेच , तसेच राज्यभरातील नामांकित साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक आणि तब्बल 250 कवी उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमात राज्यस्तरीय कवी महोत्सव, तसेच 21 आदर्श माता सन्मान आणि 11 मान्यवर ज्येष्ठ साहित्यिकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात येत आहे.
मातृत्व, साहित्य आणि संस्कृतीचा संगम घडवणारा हा सोहळा अविस्मरणीय ठरणार आहे.
हा ऐतिहासिक कार्यक्रम रविवार, दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला असून साहित्यप्रेमी, कवी, अभ्यासक आणि जनसामान्यांसाठी हा सोहळा एक पर्वणी ठरणार आहे.
