समाजाचा गौरव, योजनांचा लाभ
सुवर्ण संधी सोलापुरात!
सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर सोनार समाज संस्थेतर्फे 28 डिसेंबर रोजी भव्य गौरव सोहळा व माहिती शिबीर, सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन.
समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सोलापूर सोनार समाज संस्थेने दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता, निर्मिती लॉन्स विजयपूर रोड , सोलापूर येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाचा गौरव - योजनांचा लाभ -सुवर्ण संधी सोलापुरात या शीर्षका खाली होणाऱ्या या दुहेरी कार्यक्रमाचा लाभ मिळवून देऊन समाजाला सक्षम बनवण्याची सुवर्ण संधी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सोनार, सुवर्णंकार बांधवासाठी उपलब्ध झाली आहे.
यां कार्यक्रमाबाबत बोलताना संस्थेचे अग्रणी प्रवर्तक श्री. मोहनराव मंद्रूपकर म्हणाले की, " हा केवळ सत्कार समारंभ नसून समाजाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणणण्याचा एक प्रयत्न आहे. प्रत्येक समाज बांधवानी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. "
समाजातील बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा व शासकीय योजनांच्या माहितीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अग्रणी प्रवर्तक तथा प्रसिद्ध सराफ उद्योजक श्री संजयजी मैंदर्गीकर व संतोष कळमणकर यांनी केले आहे.
