हनीट्रॅपला बळी पडला बॅंक मॅनेजर, नारळ पाणी विकण्यारा महिलेकडून फसवणूक, चार जणांना अटक
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
इंडी येथील डीवायएसपी कार्यालयाच्या शेजारी अनेक वर्षे नारळ पाणी विकणारी एक महिला अचानक चुकीच्या मार्गाला जात नारळ पाणी विकणाऱ्या त्या ‘आंटी’ने बँक मॅनेजरला जाळ्यात ओढून *हनीट्रॅप* प्रकरणात अडकवून, धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्यामुळे अखेर तुरुंगात जावे लागले. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात तिचा मुलगा आणि एक यूट्यूब पत्रकारही सामील आहेत.
*इंडी शहरात हनीट्रॅप प्रकरण**
इंडी तालुक्यातील अंजूटगी गावातील रहिवासी असलेल्या बँक मॅनेजरला जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करत *10 लाखांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात ‘आंटी’सह एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.
हनीट्रॅप रचून धमकावणाऱ्या त्या महिला, तिचा मुलगा आणि यूट्यूब पत्रकार अशा चौघांविरुद्ध इंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आ
**ती नारळ पाणी विकणारी आंटी’ कोण?**
इंडीतील डीवायएसपी कार्यालयाजवळ फुटपाथवर नारळ पाणी विकणारी सुवर्णा होनसूरे नावाची महिला, नारळ पाणी प्यायला येणाऱ्या बँक मॅनेजर प्रताप हरणय्या (नाव बदललेले) याच्याशी ओळख वाढवत गेली.
1 नोव्हेंबर 2025 रोजी तिने त्याला गोड बोलून बोलावले. त्यानंतर त्या आंटीने मॅनेजरला आपल्या मैत्रिणीच्या घरी नेऊन त्याच्यासोबत ‘शरीरसंबंध’ प्रस्थापित केले.
5 नोव्हेंबरला मॅनेजरला धक्का बसला. आंटीने फोन करून
आपल्या प्रेमप्रसंगाचा व्हिडिओ पत्रकारांनी काढला आहे, ते धमकावत आहेत, त्यांना भेटून व्यवहार मिटवून टाका
असे सांगितले.
*आंटीनेच केले होते व्हिडिओ चित्रीकरण**
आंटी सुवर्णानेच मॅनेजरसोबतचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. त्यानंतर तिने आपल्या परिचयातील महेश बगली**, यूट्यूब आणि होमगार्ड म्हणून काम करणारा तौसिफ खरोशी यांच्याकडून फोन करून 10 लाखांची खंडणी मागितली.
या संपूर्ण कटात सुवर्णा आंटीचा मुलगा अमूल होनसूरे देखील सामील होता हे विशेष
*चार जणांना अटक**
12 नोव्हेंबरला बँक मॅनेजरने दिलेल्या तक्रारीनंतर इंडी पोलिसांनी सुवर्णा होनसूरे ( आंटी) अमूल होनसूरे (तिचा मुलगा) महेश बगली (हंजगी गाव) तौसिफ खरोशी (होमगार्ड व स्वतःला पत्रकार म्हणवणारा)
या चौघांना अटक केली आहे.
