अध्यक्षपदी संजय पाटील तर उपाध्यक्षपदी चंद्रशेखर कवटगी यांची बिनविरोध निवड
विजयपूर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
नूतन विजयपूर सौहार्द सहकारींचा महासंघाच्या ( वक्कूट ) अध्यक्षपदी संजय पाटील (कलमडी) तर उपाध्यक्षपदी चंद्रशेखर कवटगी यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी व्ही. सी. कुदापूर यांनी घोषित केले.
संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत विजयपूर सौहार्द सहकारी संस्थेच्या महासंघाचे नूतन संचालक मंडळाचे सदस्य अरुण वारद, सुरेश बिरादार, सिद्धू मल्लिकार्जुनमठ, अरुण मठ, मोनेश पत्तार, सतीश शिंत्रे, विवेकानंद शिरोळकर, यमनप्पा सातीहाळ (विजयपूर ग्रामीण) भालचंद्र मुंजाने ( बसवनबागेवाडी), राजू हंचाटे (तालीकोट ता. मुद्धेबिहाळ), आर डी कुलकर्णी (सिंदगी), चंद्रकांत पाटील ( चडचाण ता. इंडी )मलकप्पा रोटी ( तांबा, इंडी), तसेच सहकार भारती जिल्हा संघटना सचिव दीपक शिंत्रे, मुख्य सचिव परशराम चिंचली उपस्थित होते
