6 लाख पेक्षा जास्त किमतीचा 15. किलो ओला गांजा जप्त
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
: उसाच्या शेतामध्ये लागवड केलेला लाखो रुपये किमतीचा 15 किलो 100 ग्रॅम ओला गांजा जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती अबकारी निरीक्षक महादेव पूजारी यांनी दिली.
जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील कोट्याळ गावचा चंद्रशेखर शिवप्पा पाटील हा अटक केलेला आरोपी. अंदाजे 6 लाख 40 हजार रुपये किमतीचा गांजाचा माल जप्त करण्यात आला आहे.
सर्वे क्रमांक 5/1 मधील जमिनीवरील उसाच्या पिकामध्ये ओल्या गांजाच्या झाडांची लागवड करण्यात आलेली होती. याबाबत मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे आबकारी अपर आयुक्त (गुन्हे), संयुक्त उपआयुक्त बेलगाव विभाग, अबकारी उपआयुक्त विजयपूर, अबकारी उपअधीक्षक विजयपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी निरीक्षक महादेव पूजारी यांच्या पथकाने धाड टाकून गांजाची झाडे जप्त केली.
आरोपी विरुद्ध कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू असल्याचे समजते.
कार्यवाहीत अबकारी कर्मचारी माळप्पा पूजारी, प्रकाश कुंभार, अनील कुंभार, यल्लप्पा बजंत्री तसेच गृह रक्षक दलाचे कर्मचारी शिवबसु, सिद्दू आदींनी सहभाग घेतला होता
