Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

घरफोडी प्रकरण; तीन आरोपींना अटक

Responsive Ad Here

 


घरफोडी प्रकरण; तीन आरोपींना अटक






विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

अलीकडे विजयपूर शहरासह अनेक ठिकाणी झालेल्या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ८ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


विजयपूर शहरातील समीर नबीलाल इनामदार (वय२३), हसनडोंगरी येथील चांदसाब मुल्ला (वय ३३), शफीक अहमद महमदगौस इनामदार (४९) या आरोपींची अटक करण्यात आली. 

विजयपूर शहरातील हाऊसिंग बोर्ड भागात संशयास्पद हालचाली करत असताना त्यांना पोलिसांनी अडवून चौकशी केली असता चौकशीत आरोपींकडून ६५ ग्रॅम वजनाचे सोने व घरफोडीसाठी वापरलेली एक ऑटो रिक्षा असा एकूण ८ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

   या कारवाईत सहभागी असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी कौतुक केले आहे.