Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

हातभट्टी दारू जप्त; आरोपी फरार

Responsive Ad Here



हातभट्टी दारू जप्त; आरोपी फरार






विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात असलेली हातभट्टी दारू (देशी बनावटीची अवैध मद्य) अबकारी पोलिसांनी बुधवारी कारवाई करून जप्त केली. ही घटना विजयपूर तालुक्यातील कारजोळ क्रॉस जवळ घडली.कारवाईदरम्यान विक्रीसाठी साठवून ठेवलेली १०० मिलिलीटरच्या १००० पिशव्या, एक दुचाकी वाहन यासह एकूण ८०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे.या धाडीसाठी बेळगाव विभागाचे अबकारी अपर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ  अंमलबजावणी आणि गुन्हे संयुक्त आयुक्त फकीरप्पा चलवादी अंमलबजावणी व तपास उपआयुक्त मुरलीधर, एस. एन. हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विजयपूरचे अबकारी निरीक्षक महा‍देव पुजारी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली धाडीत पी. के. कुंभार, एम. एल. पुजारी, अनिल कुंभार, यल्लप्पा बजेंत्री सहभागी झाले होते.