चोरीस गेलेली इनोव्हा कार हस्तगत , आरोपी अटक
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
28 जुलै रोजी सुरेश चंद्रशेखर यरनाळ, कॉन्ट्रॅक्टर, रा. ज्ञानी कॉलनी, गणेश मंदिराजवळ, स्टेशन रोड, विजयपूर यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या नावावर असलेली टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा कार वाहन क्रमांक KA-28/P-6869, अंदाजे किंमत ₹11,81,533/- ही कार कोणीतरी चोरट्यांनी दिनांक 27.07.2025 रोजी रात्री 10.00 ते दिनांक 28.07.2025 रोजी सकाळी 06.30 या वेळेच्या दरम्यान ज्ञानी कॉलनी येथील त्यांच्या घरासमोरून चोरून नेली होती. या प्रकरणी गोलगुंबज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता
जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, जिल्हा पोलिस उपायुक्त रामनगौड हत्ती, पोलीस उप-अधीक्षक बसवराज यलिगार, यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय मल्लय्य मठपती, यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय एम. डी. घोरी, पीएसआय श्रीमती एच. डी. वालिकार, एएसआय एस. आर. हंगरगी, व इतर कर्मचारी यांनी सदर गुन्ह्यातील *आरोपी चक्रधार पिता शंकरराव संगेपू, वय 46 वर्षे व्यवसाय: कार डेकोरेशन, रा. आंध्र प्रदेश हौसिंग बोर्ड कॉलनी, राजमुंद्री, आंध्र प्रदेश, सद्यस्थितीत राहत असलेला – घर क्रमांक 07/21 लक्ष्मा रेड्डी पाळ्येम, पेड्डा अंबरपेट, हैदराबाद, तेलंगणा यास अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली अंदाजे ₹11,81,533/- किंमतीची इनोव्हा कार जप्त करण्यात आली आहे. आरोपीस न्यायालयीन कोठडीत दाखल करण्यात आले आहे.
सदर प्रकरणात उत्तम सेवा बजावल्याबद्दल संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करण्यात आले आहे.