Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

आलमेलमध्ये घरफोडी प्रकरणी दोघांना अटक , दहा लाख रुपयांच्या मालमत्ता जप्त

Responsive Ad Here

 आलमेलमध्ये घरफोडी प्रकरणी दोघांना अटक  , दहा लाख रुपयांच्या मालमत्ता जप्त







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 जिल्ह्यातील आलमेल शहरात अलीकडेच अनेक घरेफोडींचे गुन्हे नोंदवले गेले होते, त्या संदर्भात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या कडून 

सुमारे *रु. 10 लाख 52 हजार रुपयांची मालमत्ता* जप्त करण्यात आली आहे.

देवरहिपरगी तालुक्यातील चिक्करुगी गावचे रहिवासी *शरणबसू महादेव जाळवाड (वय 31)* आणि *प्रकाश निंगप्पा कांबळे (वय 21)* या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून 

86 ग्रॅम सोन्याचे दागिने सुमारे *रु 8.60 लाख रुपये ,67 ग्रॅम चांदीचे दागिने  सुमारे रु  67 हजार रुपये*

5 मोटारसायकल्स  (गुन्ह्यासाठी वापरलेले) – सुमारे *रु 1.25 लाख रुपये एकूण अंदाजे रु 10.52 लाख रुपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे.

दोन्ही आरोपींना अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

या कारवाईत जिल्हा पोलिस उपायुक्त रामनगौडा हट्टी, जगदीश एच.एस., नानगौडा पोलीस पाटील, अरविंद अंगडी, एस.एम. पडशेट्टी तसेच पोलीस कर्मचारी  एच.टी. गोडेकर, सलीम सवदी, सिद्राम पाटील, एस.बी. यतनाळ, व्ही.एस. आळूर, एस.एस. जाळगेरी, बी.एस. मेदेदार, बी.जी. क्षत्री सहभागी झाले होते.