अवैधरीत्या शासकीय धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रक ताब्यात
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामनगौड हत्ती, पोलीस उपअधीक्षक बसवराज यलिगार (विजयपूर शहर), तसेच सीपीआय मल्लय्य मठपती (गोलगुंबज सर्कल) यांच्या मार्गदर्शनाखाली, सरकारच्या विविध योजनेअंतर्गत पुरवठा केला जाणारा शासकीय अन्नधान्य (रेशन धान्य) अवैधरित्या वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर, सिताराम लमाणी
आणि विजयकुमार निंगप्पा गुमशेट्टी, अन्न निरीक्षक (विजयपूर) यांच्या संयुक्त कारवाईत, पीसीआय श्रीमती पी.एस. कुचबाळ आदर्शनगर पोलीस स्टेशन तसेच कर्मचारी आर.एस. मरेगुडी
पी.एस. आजूर आणि मस्तान बगळी यांनी मिळून दि. 12.संप्टेबर रोजी संध्याकाळी 4.45 च्या सुमारास विजयपूर शहरातील "विजया ट्रॅव्हल्स" समोरील सर्व्हिस रोडवर धाड टाकून एक ट्रक ताब्यात घेतला.
ट्रकमध्ये शासकीय वाटपासाठी असलेले अन्नधान्य अवैधरित्या वाहून नेले जात होते. याप्रकरणी
गजानन भीरप्पा मकाळे (वय 31 वर्षे), व्यवसाय: चालक, रा. आजूर, ता. अथणी, जि. बेळगाव
मारुती दोडमणी, रा. गणेशवाडी, अथणी इक्बाल तहसीलदार, रा. आजाद नगर, बेळगाव यांना अटक करण्यात आली आहे
यापैकी आरोपी क्र. 1 (चालक) याने पोलीस तपासात सांगितले की, आरोपी क्रमांक 2 व 3 यांनी त्याला विजयपूरमधील एफसीआय रेल्वे गुड्स शेडमधून अन्नधान्य आणण्यास सांगितले होते. त्यांच्याकडे या शासकीय धान्याची वाहतूक करण्याचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता.
त्यांच्याकडून 426 पोती अन्नधान्य (तांदूळ) – 210.43 क्विंटल , किंमत: ₹4,76,310/-
अशोक लेलँड ट्रक क्र.: MH-46/F-2761** – अंदाजे किंमत: ₹5,00,000/- जप्त करण्यात आले आहे
या घटनेबाबत आदर्शनगर पोलीस ठाण्यात *गुन्हा नोंदवण्यात आला असून, आवश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 सह कलम 7 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.