आमदार बसनवगौडा पाटील यांच्या अनुदानातून महिंद्रा बोलोरो वाहन हस्तांतर
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
शहर विधानसभा आमदारांच्या स्थानिक क्षेत्र विकास योजने अंतर्गत सन 2025-26 साली मंजूर करण्यात आलेल्या ₹11 लाखांच्या अनुदानातून खरेदी करण्यात आलेल्या नवीन महिंद्रा बोलेरो वाहनाचे हस्तांतरण बुधवारी शहरचे आमदार बसवनगौडा पाटील यतनाळ यांनी पोलीस निरीक्षक, वाहन वाहतूक विभाग, डीएआर विजयपूर यांच्याकडे वाहनाची किल्ली सुपूर्त करून केले.
या प्रसंगी डीवायएसपी सुनील कांबळे, मुरगेप्पा उपासे, सीपीआय रवी यडवण्णावर, रायगोंड जानवर, परशुराम मनगुळे, पीएसआय यतींद्र, आरपीआय ईरसंगप्पा तेली, आरएसआय श्रीरंगप्पा, एआरएसआय अशोक कांबळे, हवालदार विश्वनाथ चव्हाण आणि इतर अधिकारी उपस्थित होते.