स्वराज्य च्या सोलापूर शहर अध्यक्षपदी विनोद भोसले यांची निवड
अक्कलकोट/ प्रतिनिधी
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या सोलापूर शहर अध्यक्ष पदी सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते विनोद भोसले यांची निवड करण्यात आली, त्याच बरोबर सोलापूर जिल्हा प्रभारी म्हणून इफ्तेकार कामतीकर तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी अक्कलकोट चे चंद्रकांत वेदपाठक यांची निवड करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री दिपक कांबळे व संस्थापक तथा महासचिव श्री कमलेश शेवाळे (देवा सर ) महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा सौ धनश्रीताई उत्पात मॅ. महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख श्री उमेश काशीकर यांनी स्वराज्य चौथ्या वर्धापन दिवशी मुंबई ( ठाणे ) येथील कार्यक्रमात केली आहे, या निवडचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
स्वराज्य चे चतुर्थ वर्धापन दिन ठाणे रेल्वे स्टेशन च्या बाजूला असलेल्या रेल्वे सभागृहात मोठया थाटात पार पडला.
या प्रसंगी संघटनेच्या विश्वस्त सौ. संगीता बोराडे, सौ सविता तावरे उमेश काशीकर, प्रशांतजी निकम संचालक सुरेखा कोकरे, रविंद्रजी करंगुटकर, विशाल बोराडे, संदिप जाधव वैशालीताई कांबळे स्वराज्य चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक, जिल्हा प्रभारी इफ्तेकार कामतीकर, माजी समन्वयक सुनील पंडित, ( लाला ) इम्तियाज बागवान, सुनील बेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर शहर अध्यक्ष पदी विनोद भोसले यांच्या निवडीचे सोलापूर शहर स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी सदस्य प्रकाश चव्हाण, सत्तु भोसले, सोमनाथ कस्तुरे, सुधीर सलगर, दत्तात्रय दळवी, वैशालीताई गोरे मॅ, स्मिता पाठक मॅ.आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.