मोटरसायकल अपघातात अधिकारीचा मृत्यू..!
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
मोटरसायकल अपघातात सरकारी अधिकारीचा मृत्यू झाल्याची घटना सिंदगी रोडवरील देशपांडे तांडा जवळ घडली आहे.
इंडी तालुक्यातील सालोटगी गावचे चंद्रकांत सूर्यवंशी (वय 36) हे मोटरसायकल अपघातात मरण पावले आहेत.
काल संध्याकाळी त्यांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याने ते केक आणण्यासाठी इंडी शहरात गेले होते, असे त्यांनी घरच्यांना सांगितले होते. परंतु ठिक 7:30 वाजता सालोटगी गावाकडे परत येत असताना त्यांच्या बाइकला अपघात झाला. बाइक घसरून ते खाली पडले आणि डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने तालुक्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
