श्री समर्थ समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार श्रीमती राजश्री पोतदार यांना जाहीर
सोलापूर/ प्रतिनिधी
अक्कलकोट येथील बाळासाहेबांची शिवसेना, सोनार हक्क परिषद सोलापूर जिल्हा, स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना अक्कलकोट तालुका यांच्या संयुक्त विद्यामाने सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत वेदपाठक यांनी आज जाहीर केलेल्या 11 पुरस्कार्थिंच्या यादीत अक्कलकोट येथील श्रीमती राजश्री आण्णाराव पोतदार यांच्या शासकीय सेवा आणि सामाजिक व इतर क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना श्री समर्थ समाज भूषण राज्यस्तरीय पुरस्कार
2025 जाहीर करण्यात आला आहे. *श्रीमती राजश्री आण्णाराव पोतदार अक्कलकोट यांचे कार्य एक आदर्श आई आणि परिचारिका म्हणून अतुलनीय आहे*. आई व परिचारिका दोघीही सेवा व समर्पणाचे प्रतीक आहेत. मूल घडविण्यात आईचे व रुग्ण सेवेत परिचारिकेचे योगदान अमूल्य आहे. दोघीही कुटुंबाची व रुग्णाची सेवा आत्मीयतेने करतात. दोघींचे अस्तित्व प्रत्येकाच्या मनात सर्वोच्च स्थानी आहे. त्यांच्या कार्याची तुलनाचं होऊ शकत नाही. त्यांचे कार्य अमूल्य आणि अतुलनीय आहे.
श्रीमती राजश्री पोतदार या 35 वर्षे जिल्हा परिषद सोलापूर च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिकेची सेवा करून नियत वयोमानानुसार सन 2005 मध्ये सेवानिवृत्त झाले. सेवा निवृत्तीनंतर त्यांनी पूर्ण वेळ कुटुंबासाठी दिले. त्यांचे पती श्री आण्णाराव पंढरीनाथ पोतदार हे सोनारी काम व सामाजिक कार्य करीत होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.त्यांना दोन मुले अनुक्रमे दीपक पोतदार व प्रकाश पोतदार दोघेही विवाहित असून अनुक्रमे सराफी व सामाजिक कार्य करतात. श्री प्रकाश यांचे रेडिओ टी. व्ही दुरुस्ती सेंटर आहे ते काम करत सामाजिक कार्यात ही त्यांचा प्रत्येक्ष सहभाग असतो. दोघेही एकत्रित राहतात. असे एकत्रित कुटुंब व्यवस्था सध्या दुर्मिळ होत चालले आहे. त्यांचे घर म्हणजे प्रत्येक्ष गोकुळ च आहे. याचे श्रेय मातोश्री राजश्री पोतदार यांनाच जाते.कारण कुटुंब एकत्रित ठेवायला त्या पूर्णपणे सक्षम आहेत. सुनाना मुलीप्रमाणे वागणूक आणि प्रेम देऊन नातवंडाना दुधाच्या सायी प्रमाणे जपतात.
यावर्षी जागतिक मातृ दिन 11 मे व जागतिक परिचारिका दिन 12 मे रोजी आहे. आईचा सन्मान व तिच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. या दिवशी आईच्या निस्वार्थी आणि समर्पणाला आदरांजली दिली जाते. आई म्हणजे प्रेम, माया, काळजी. आई आपल्या मुलांचे दुःख कमी करण्यासाठी स्वतः दुःख सहन करते. टी आपल्या मुलांना चांगला नागरिक बनवते. त्यांच्या जीवनात आनंद भरते. त्यांना नेहमी साथ देते. आईचे प्रेम निःस्वार्थ असते. ती आपल्या मुलावर कोणत्याही हेतू शिवाय प्रेम करते. मुलांच्या भविष्यासाठी स्वतःचे त्याग करते. 12 मे रोजी जागतिक परिचारिका दिन आहे. या दिवशी परिचारिकेच्या योगदानाबद्दल व तिच्या धैर्याबद्दल त्यांच्या कार्याचा आदर करण्याचा हा दिवस.! कांहीही आपले ऋणानुबंध नसताना अगदी आपलकीने मनोभावे विचारपूस करीत जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण भागात रुग्ण सेवा त्यांनी दिली. त्यांचसोबत सोनार समाजा प्रती आपले योगदान ही त्यांनी दिले आहे. रुग्णांची सेवा कोण करतं असा प्रश्न केल्यानंतर डॉक्टर आधी नांव येते ते परिचारिकेचे. त्यांना वेळेची तमा नसते. रुग्णच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम परिचारिका करतात. स्वतःच्या सुख दुःखाची, वयक्तिक हाल अपेंष्ठा कडे दुर्लक्ष करतं त्या अविरतपणे रुग्ण सेवेत गुंतलेल्या असतात. अक्कलकोट च्या संस्थेने 11 मे जागतिक मातृ दिन व 12 मे जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून समर्पण आणि मेहनत त्याग, दुःखात सांत्वन व संकटात आयुष्यभर आधार देणाऱ्या, रुग्ण सेवेसाठी समर्पित व्यक्तिमत्व असलेल्या श्रीमती राजश्री आण्णाराव पोतदार यांच्या उल्लेखनीय आणि लक्षवेधी कार्याची नोंद घेऊन त्यांना श्री समर्थ समाज भूषण राज्यस्तरीय पुरस्कार 2025 जाहीर केल्याबद्दल आयोजक श्री चंद्रकांत दादा वेदपाठक यांना धन्यवाद! आणि श्रीमती राजश्री ताई पोतदार यांचे अभिनंदन व शुभेच्छा.
हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृह, फत्तेसिंह चौक येथे दिनांक 18 मे 225 रोजी दुपारी ठीक दोन वाजता संपन्न होणार आहे. हा
कार्यक्रम अतिविशिष्ट मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
- वसंत पोतदार सोलापूर -
