'संघर्ष कन्या' पुजा वेदपाठक यांना सुवर्ण हिरकणी राज्यस्तरिय पुरस्कारांने सन्मानित
पंढरपूर / प्रतिनिधी
येथे अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई जि बीड च्या वतीने सन्मान सुवर्ण रत्नांचा राज्यस्तरिय पुरस्कार सोहळा २८ मार्च वार-शुक्रवार या दिवशी मोठ्या थाटामाठात संपन्न झाला.
अंबाजोगाई येथे सध्या आपल्यां चिमुकल्यां दोन मुलासह स्वतहा:ची उपजिविका पत संस्थेत नौकरी करुन अल्पशा पगारावर आपला व आपल्यां मुलांचा उदरनिर्वाह भागवत सध्या पतीच्या अपघाती निधना नंतर मुलीचे पालन पोषण शिक्षण करुन जीवन जगणांऱ्यां श्रीमती पुजाताई विजय वेदपाठक (रा.पिंपळगांव कौ.ता.कळंब जि.धाराशिव) यांचा हा संघर्ष वाखण्यांजोगे आहे.
पुजा विजय वेदपाठक या सामाजिक कार्यकर्ते तथा अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई जि बीड चे संस्थापक अध्यक्ष राजेश पंडित रेणापूरकर यांच्या त्या एकुलत्या एक कन्या असून त्या पदवीधर असल्यांने सहजतेने पत संस्थेत नौकरी मिळाली व गेली तीन वर्षापासून अंबाजोगाई येथील महिला एकल संघटना संचलित महिला स्वालंबन निधि या बँकेत क्लार्क म्हणून काम पाहात असून जिद्द,चिकाटी,मेहनत व प्रामणिकतेच्या जोरावर तिथे त्या सध्या सन्माानपुर्वक कार्यरत आहेत तसेच आई,वडील,भाऊ,वहिणी यांच्या आधारावरचं त्या अंबाजोगाई येथे स्थायिक असून मुले ही येथील नामांकित अशा योगेश्वरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत पुजाताईंचा हा खडतर प्रवास २०२० पासून चालूचं आहे.
ताईंच्या या महत्वपुर्ण कार्याची दखल घेवूनं त्यांना संघर्ष कन्या सुवर्ण हिरकणी पुरस्कारांने मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देवूनं जेष्ठ समाज सेविका सौ.जयश्रीताई शहाणे तसेच जेष्ठ कवियत्री तथा समाज सेविका विजयाताई दहिवाळ व नाशिक येथील सुवर्ण भरारी बहुउद्देशिय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा रणरागिणी असलेल्यां श्रीमती सारिकाताई नागरे यांनी सन्मानपत्र,सन्मानचिन्ह देवूनं सत्कार केला या वेळी वडील राजेश पंडित व पुजा वेदपाठक हे दोघेही भावुक झाले होते या वेळी उपस्थितांच्या ही डोळ्यांतून अश्रू वाहात होते ऐन तारुणांत पतीच्या जाण्यांने खांद्यावर पडलेली ही जबाबदारी सक्षमपने पेलायची व मुलांना चांगले शिकवायचे ही मनांशी बांधलेली खुण गाठं घेवूनं समाजात सन्मानांने जगायचे असे ही त्यांनी या वेळी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल धर्माधिकारी साहेब तसेच स्वागताध्यक्ष सुभाष वेदपाठक,उदघाटक श्रीनिवास बानकर तसेच अविनाश पंडित,संजय आष्टीकर, प्रमोद वेदपाठक, सुधाकर शहाणे,भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे तसेच काशिनाथ पोतदार, सचिन बानकर,बालाजी दिक्षित व अन्य मान्यवर तसेच असंख्य समाज बांधव माता भगिनीं मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
