सुरेश पोटे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या कडे मांडल्या
मुंबई/ प्रतिनिधी
गणेश नाईक वनमंत्री, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री, पालघर जिल्हा यांच्या जनता दरबारात महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे मुबंई नवी मुंबई विभाग अध्यक्ष सुरेश पोटे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्या व समस्या चर्चा करून त्या मागण्याचे निवेदन मंत्री महोदय यांना दिले या मध्ये नवी मुंबई मधील ज्येष्ठ नागरिकांन साठी सहली साठी नवी मुंबई परिवहन ची बस वर्ष्यातून एक वेळ विरुंगळा केंद्र व संघटनाना देण्यात यावी ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्ष्यातून एक वेळ विष्णूदास भावे सभागृह महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) संस्थेस मिळावे अशी मागणी केली तसेच राज्य व केंद्र सारखाच्या प्रलंबित मागण्यासाठी निवेदन दिले.
त्या वेळेस मा. नगरसेविका सौ नेत्राताई शिर्के यांनी पुढाकार घेऊन आम्हा ज्येष्ठ नागरिकांना प्रधान्य देऊन भेट करून दिली, ज्येष्ठ नागरिक संघ उपाध्यक्ष प्रभाकर गुमास्ते, गायकवाड, सावंत, रंजीत दिक्षित आदी उपस्थित होते मंत्री गणेश नाईक यांचा फेस्कॉम तर्फे शाल व पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला. जनता दरबार पूर्ण भरला होता. नाईक यांनी सहआयुक्त श्री पवार यांना सूचना करून संपर्क साधावा असे सांगितले.
