ह.भ.प. डॉ. श्रीगुरु जयवंत महाराज बोधले यांना कीर्तन सेवा पुरस्कार
विजयपूर/ प्रतिनिधी - दिपक शिंत्रे
ह.भ.प.डाॅ श्रीगुरू जयवंत महाराज बोधले ,श्रीक्षेञ पंढरपूर ( श्री संत माणकोजी महाराज बोधले यांचे वंशज) यांना डाॅ.रामचंद्र देखणे स्मृती कीर्तन सेवा पुरस्कार या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
संत विचार प्रबोधनी ,पुणे आयोजित वै. डाॅ .रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा टिळक स्मारक पुणे येथे रविवार दि १३/४/२०२५ रोजी सायंकाळी ५:३० येथे आयोजित करण्यात आला आहे
हा पुरस्कार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेञाचे कोषाध्यक्ष स्वामी गोंविददेव गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ह.भ.प डाॅ श्रीगुरू जयवंत महाराज बोधले यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांसाठी उच्च शिक्षण मंञी श्री चंद्रकांत दादा पाटील आमदार श्रीकांत भारतीय यांची प्रमुख उपस्थिती व डाॅ अरुणा ढेरे ( संमेलानाध्यक्ष मराठी साहित्य संमेलन ) या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तसेच वासकर महाराज फडाचे श्री राणा महाराज वासकर श्री संत ज्ञानेश्वर देवस्थान समितिचे विश्वस्त श्री योगी निरंजनाथ यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
