Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

बसवनगौडा पाटील यांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा, निलंबन मागे घेण्याची मागणी

Responsive Ad Here


बसवनगौडा पाटील यांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा, निलंबन मागे घेण्याची मागणी 






विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

भ्रष्टाचार आणि कौटुंबिक राजकारणाला विरोध करणारे कट्टर हिंदू नेते बसवनगौडा पाटील यत्नाळ यांची भाजपमधून निलंबित करण्याच्या अन्यायाविरोधात बसवनगौडा यांचे समर्थक, हजारो हिंदूत्ववादी कार्यकत्यांनी शुक्रवारी शहरात आपल्या शक्ती प्रदर्शन करीत मोर्चा काढला व निलंबन मागे घेण्याची मागणी केली 

शहरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरात जमलेल्या हजारो कार्यकर्ते एक सभा घेतली, त्यानंतर येडियुरप्पा आणि विजयेंद्र यांचे छायाचित्रे घेऊन गांधी चौकापर्यंत मोर्चा काढला आणि निषेध करण्यासाठी रास्ता रोको केला.  वेळी बाप चोर, मुलगा लबाड, येडियुरप्पा आणि विजयेंद्र यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.


आंदोलनात सर्वत्र भगवा फडकत होता. सहभागी झालेल्या सर्वांच्या गळ्यात शाल, भगवी टोपी  लक्ष वेधून घेत होती.

नंतर बोलताना स्वामी विवेकानंद सेनेचे अध्यक्ष राघू अंनिगेरी म्हणाले, हिंदुत्व ही बसवनगौडांची संपत्ती आहे. सर्व हिंदू त्यांची शक्ती आहेत. बसवनगौडा पाटील यत्नाळ हे  एकटेच पिता-पुत्रांच्या कारस्थानातून हाकलले गेलेले नाहीत, उलट पक्षातून संपूर्ण हिंदुत्वांची हकालपट्टी करण्यात आल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.

प्रमुख हिंदुत्ववादी नेत्यांना टार्गेट करून घेतलेल्या चुकीच्या निर्णयाची फेरविचार करणे योग्य ठरेल. अन्यथा संपूर्ण देशातील हिंदू तुम्हाला योग्य धडा शिकवतील हिंदुत्वाचा नेता कोण, असे विचारले तर पहिले नाव येते ते बसवनगौडा पाटील यत्नाळांचे हिंदू कार्यकर्त्यांची राज्यात जिथे जिथे हत्या झाली , अन्याय झाला तिथे भेट देऊन सांत्वन केले आहे आणि आर्थिक मदतही केली आहे 

दयासागर पाटील म्हणाले, "भाजपने आमच्या नेत्यांची हकालपट्टी केली हे दुर्दैव आहे.हा संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान असून संताप व्यक्त करुन त्यांची ताकद काय आहे, हे आपण हायकमांडला दाखवून दिले पाहिजे असे सांगून  हायकमांडने निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

एम.एस.रुद्रगौडा, बी.एस.पाटील नगराला हुली, गुरु गच्छीनमठ आदी नेते आणि हजारो हिंदू चाहते, निष्ठावंत कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या.