माध्यमिक संघटना समन्वय समितीच्या अध्यक्षपदी आयुब मुल्ला तर सचिव पदी सागर पाटील
जिल्ह्यातील 13 माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनांचा समावेश
रत्नागिरी/ प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना समन्वय समितीची नुकतीच माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी रत्नागिरी येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये समन्वय समितीच्या कार्यकारणीची पुनर्रचना करण्यात आली. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष आयुब मुल्ला यांची तर सचिव पदी माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांची निवड करण्यात आली. कोणत्याही संघटनेच्या वैयक्तिक प्रश्नांमध्ये हस्तक्षेप न करता जिल्ह्यातील सामुदायिक व धोरणात्मक प्रश्न समन्वय समितीच्या वतीने हाताळण्यात येणार असल्याचे सचिव सागर पाटील यांनी सांगितले. अध्यक्ष आयुब मुल्ला यांनी सर्वांनी एकत्र येऊन गैरप्रकाराला आळा घालण्याचे आवाहन केले.
जिल्हा समन्वय समितीमध्ये सहभागी असणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व 13 संघटनांचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा सचिव यांचा समावेश समन्वय समितीमध्ये करण्यात आला आहे. समन्वय समिती मधील अन्य पदाधिकारी खालील प्रमाणे उपाध्यक्ष - प्रदीप वाघोदे ( कास्ट्राईब संघटना), संदीप कांबळे( शिक्षक सेना), संजय पाथरे ( शिक्षक भारती), ज्ञानेश्वर शिंदे ( शिक्षक परिषद),रामचंद्र केळकर ( शिक्षकेतर कर्मचारी संघटना), खजिनदारपदी शिरिष कुमार भालशंकर ( कास्ट्राईब संघटना) सह खजिनदार - बी आर पाटील ( उच्च माध्यमिक संघटना) ,लक्ष्मण गोरे (चतुर्थी कर्मचारी संघटना ), सहसचिव - आनंद त्रिपाठी (शिक्षण क्रांती संघटना ),सुनील जोपळे ( आफ्रोड संघटना),शौकत महाते ( उर्दू संघटना ), विवेक महाडिक ( ग्रंथपाल संघटना ), इम्तियाज काझी (प्रयोगशाळा सहाय्यक संघटना )यांचा समावेश आहे. तर सदस्य पदी महेश पाटकर, रोहित जाधव, एस.एन कांबळे, प्रकाश पांढरे,सुनील जाधव,निलेश कुंभार, पांडुरंग पाचकुडे,दिलीप जाधव राकेश मुंडे,आशिष सरफरे,राहुल सप्रे,सुलेमान तडवी,अमोल लिंगायत,दिनेश वेताळे व अजमल मुल्ला यांचा समावेश करण्यात आला आहे.
मागील पाच वर्ष समन्वय समितीने जिल्हास्तरावरील धोरणात्मक प्रश्न सोडवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे यापुढे देखील समन्वय समितीच्या वतीने शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी सर्व संघटनांच्या मदतीने प्रयत्न केले जातील असा विश्वास उपस्थितांसमोर अध्यक्ष आयुब मुल्ला व सचिव सागर पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष या नात्याने आयुब मुल्ला यांनी दापोली या ठिकाणी होऊ घातलेले मुख्याध्यापक संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनास सर्वांनी सहकार्य करावे व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केल.उपस्थितांचे आभार समावेश समितीचे सचिव सागर पाटील यांनी मांडले.