Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

बसवनगौडा पाटील यांचे निलंबन, जिल्हा कोअर कमिटीचे समर्थन

Responsive Ad Here


बसवनगौडा पाटील यांचे निलंबन, जिल्हा कोअर कमिटीचे समर्थन






विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 विजयपूर शहर आमदार बसवनगौड पाटील यत्नाळ यांना पक्षातून निलंबित करण्याचा भाजपच्या केंद्रीय शिस्त समितीच्या निर्णयाला भाजप जिल्हा कोअर समितीने या निर्णयास पाठिंबा देऊन समर्थन केले आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष गुरूलींगप्पा अंगडी यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत विधान परिषद येथील माजी सदस्य अरुण शाहापूर यांनी या निर्णयाशी संबंधित सर्व मुद्द्यांची विवरण  देत बसवनगौडा पाटील यत्नाळ यांच्या निलंबन भाजप शिस्त समितीच्या निर्णयाला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे, असे शाहापूर यांनी स्पष्ट केले.

शाहापूर म्हणाले, "त्यांचे निलंबन हा एक राजकीय विषय आहे, यामध्ये पंचमसाली समाजाला ओढून राजकारण करणं योग्य नाही,

भाजप जिल्हाध्यक्ष गुरूलींगप्पा अंगडी यांनी सांगितले की, मला पक्ष महत्त्वाचा आहे, व्यक्ती नाही. मी कधीही व्यक्तीला घाबरणारा नाही, आणि पुढील सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला विजय मिळविणे हा माझा निर्धार आहे."

 *दोन्ही राजीनामे आले आहेत*


भाजपच्या ९ मंडळांपैकी केवळ शहर मंडळातील शंकर हुगार आणि सचिव सिद्धू यांनीच राजिनामा दिला आहे, . सध्या अधिकृतपणे फक्त दोन राजिनामे प्राप्त झाले आहेत, असे जिल्हाध्यक्ष अंगडी यांनी स्पष्ट केले.  मोठ्या संख्येने भाजप सदस्यांनी पक्षाच्या सदस्यत्वापासून राजिनामा दिल्याचा दावा चुकीचा आहे" असे  यांनी सांगितले.

माजी आमदार ए.एस. पाटील नडहळी यांनी सांगितले की, 

"राज्यात भाजपला येडियुरप्पा हे पितामह आहेत, भाजप राज्याध्यक्ष बी.वाई. विजयेंद्र यांच्यावर विनाकारण खोटे आरोप करणं योग नाही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात आंदोलन करुन अपमानास्पद वर्तण करणे, वक्तव्य करणे योग्य नसल्याचे सांगितले 

 माजी मंत्री एस.के. बेळ्ळोबी, अप्पसाहेब पटणशेट्टी, रमेश भूसनूर, भाजपचे वरिष्ठ नेते विजुगौड पाटील, उमेश कारजोळ, डॉ. सुरेश बिरादार, गोपाळ घटकांबळे, रविंद्र लोणी, विजय जोशी व इतर उपस्थिती होते.