ओबीसी हक्क परिषद दिल्ली, चे दुधनी कार्यकारिणी जाहीर
दुधनी- येथील श्री शांतलिंगेश्वर विरक्तमठ दुधनी येथे ओबीसी हक्क परिषद दिल्ली च्या खाली दुधनी शहराचे कार्यकारिणी निवड करण्यात आली.
प्रथम श्री शांतलिंगेश्वरांची पुजा व सावित्रीबाई फुले यांना मानवंदना ओबीसी हक्क परिषद दिल्ली चे राष्ट्रीय संघटक तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी सुरेशसिंह परिहार यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश संघटक काशीनाथ पोतदार यांनी ओबीसी हक्क परिषदे बद्दल माहिती सांगितले. की
ओबीसी हक्क परिषद दिल्ली हे भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे बंधु प्रल्हादराव मोदी हे राष्ट्रीय सल्लागार असुन संस्थापक अध्यक्ष प्रदिप बाबुराव फाले,तर कैलास सोनवणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. आणि ओबीसी समाजावर वारंवार अन्याय होत असल्याने या अन्यायाचा अंत करुन ओबीसी समाजाला हक्काचे न्याय मिळवून देऊ असे काशीनाथ पोतदार म्हंटले.
त्यानंतर पुढीलप्रमाणे कार्यकारिणी ओबीसी समाजाच्या संगमताने निवड करण्यात आली.
दुधनी शहर अध्यक्ष- हणमंत कलशेट्टी
उपाध्यक्ष- कल्याणराव किवडे
सचिव- विरभद्र पोतदार
संघटक- श्रीशैल फुलारी
कार्याध्यक्ष- संतोष पोतदार
अशा प्रमाणे कार्यकारिणी निवड करण्यात आली व ओबीसी हक्क परिषदेचे राष्ट्रीय संघटक तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी सुरेशसिंह परिहार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन ओबीसी हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक काशीनाथ पोतदार यांनी केले, तर ओबीसी हक्क परिषदेचे दुधनी शहराध्यक्ष हणमंत कलशेट्टी यांनी आभार मानले.
यावेळी दुधनी शहरातील ओबीसी समाज बांधव बसवराज अमाणे, हणमंत फुलारी, बसवराज बंद्राड, विठ्ठल सुतार, काळप्पा पोतदार, विठ्ठल अमाणे, गुरुशांत पत्थार, सिध्दलिंग पोतदार आदी ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
